Jahnavi Killekar | 'आता ही गोष्ट लपवण्याचं कारण नाही, कारण आमचा सुरज लवकरच...', जान्हवीने शेअर केला खास ओटी भरणीचा व्हिडिओ

Jahnavi Killekar | 'आता ही गोष्ट लपवण्याचं कारण नाही'; जान्हवी किल्लेकरने शेअर केला खास ओटी भरणीचा व्हिडिओ
janhavi killekar-suraj chavan
Jahnavi Killekar shared special video of suraj chavan pudhari photo
Published on
Updated on
Summary

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर मार्च महिन्यात झालेल्या ओटी भरणी समारंभाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच तिने कुटुंबातील आनंदाची बातमी देत, 'आमचा सुरज लवकरच बाबा होणार' असे सांगितले. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Marathi actress Jahnavi Killekar shared special video of suraj chavan

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या तिच्या एका खास सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. मार्च महिन्यात पार पडलेल्या चोर ओटी समारंभाचा व्हिडिओ अखेर समोर आला आहे. ही खास आठवण शेअर करताना मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने आनंदाची बातमीही दिली आहे. 'आता ही गोष्ट लपवण्याचं कारण नाही, कारण आमचा सुरज लवकरच बाबा होणार आहे,' असे तिने म्हटले आहे.

आपल्या कुटुंबातील आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर करत तिने मार्च महिन्यात झालेल्या ओटी भरणी समारंभाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओसोबत तिने दिलेल्या कॅप्शनने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जान्हवीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "मार्च महिन्यात भरलेल्या चोर ओटी चा video आत्ता share करतेय... कारण आत्ता confirmed सांगायला काहीच हरकत नाही की, आपला सुरज लवकरच "बाबा " होणारे..." सोबतच तिने एव्हिल आय आणि रेड हार्ट इमोजी शेअऱ केला आहे. जान्हवीच्या पोस्टमुळे सुरज चव्हाणच्या कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचलीय.

janhavi killekar-suraj chavan
Prajakta Mali |प्राजक्ताची दक्षिणेकडे पाऊले, तेलुगू इंडस्ट्रीतून नवा अवतार येणार समोर

जान्हवीने शेअर केलेल्या व्हिडिओतही काही सुंदर आणि भावनिक क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. कुटुंबातील सदस्यांचा आनंद, उत्साह आणि प्रेम जान्हवी आणि सुरजच्या चेहऱ्यावर दिसतो आहे.

janhavi killekar-suraj chavan
Mumbai Police Viral Post: '370 रुपयांची बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची एन्ट्री; एका पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ

सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी आणि कलाकार मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून होणाऱ्या आई-बाबाला शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेकांनी जान्हवीचे खूप कौतुक देखील केले आहे. अभिमान वाटतो तुझा जान्हवी, तू फक्त नाती बोलून दाखवत नाहीस तर निभावून पण दाखवतेस. शब्द नाहीत तुझ्यासाठी; निभावणारी म्हणजे जान्हवी ताई, मला हाच स्वभाव आवडतो जान्हवी चा खूप गोड आहे, प्रत्येकाला जपणारी दिसते, असे अनेक कॉमेंट्स जान्हवीसाठी सोशल मीडियावर येत आहे.

अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जान्हवीने नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील निवडक क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. चार दिवसांपूर्वी तिने सुरजच्या घरी भेट दिल्याचा आणखी एक व्हिडिओ शेअऱ केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना जान्हवीने लिहिलं होतं की-''कोणी असो-नसो...मी कायम तुझ्या सोबत आहे... तुला जपणार आहे.''

दरम्यान, सुरज लवकरच बाबा होणार असल्याच्या बातमीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून चाहत्यांनाही या गोड बातमीचा आनंद झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news