Jacqueliene Fernandez B'day Gifts | सुकेशने जॅकलिनला दिले यॉट, आयफोन...
पुढारी ऑनलाईन डेस्क : जॅकलीन फर्नांडिसने ११ ऑगस्ट रोजी आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तुरुंगात असतानाही महाठगने सुकेशने जॅकलिनसाठी महागडे गिफ्ट पाठवले. सध्या सुकेश चंद्रशेखर तिहारच्या तुरुंगात आहे. त्याने जॅकलिनला एक यॉट गिफ्ट केलं आहे. शिवाय, जनावरांचा दवाखाना देखील गिफ्ट केलं आहे, जे अखेरच्या वर्षापर्यंत उभारेल. (Jacqueliene Fernandez B'day Gifts )
सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला काय काय गिफ्ट केलं?
दिल्लीतील तिहारच्या तुरुंगात महाठग सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला गिफ्टमध्ये खासगी यॉट दिलं. जॅकलीनने ११ ऑगस्ट रोजी आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला. सुकेशने गिफ्टमध्ये जॅकलीनला यॉट दिले. त्याचे नाव जॅकलीनवर ठेवण्यात आले आहे. हे तेचं यॉट आहे जे सुकेशने २०२१ मध्ये जॅकलीनसाठी निवडलं होतं. इतकचं नाही तर जॅकलीनचे नवे गाणे हिट करण्यासाठी १०० आयफोन १५ प्रो देण्याची घोषणा देकील केली आहे. सुकेशने एक पत्र जॅकलीनच्या नावाने लिहिलं आणि त्य़ामध्ये या गिफ्टचा उल्लेख केला.
सुकेश चंद्रशेखरने आपल्या पत्रात सांगितले की, ‘लेडी जॅकलीन’ नाव हे यॉट या महिन्यात डिलिव्हर केलं जाईल. त्यांनी सांगितले की, यॉटचे सर्व कर देण्यात आले आहेत आणि ते संपूर्णपणे वैध आहे. जॅकलीन ॲनिमल वेलफेयरच्या एरियामध्ये काम करत आहे. सुकेश म्हणाला की, त्याने जॅकलीनला बंगळुरुमध्ये जे पाळीव प्राण्यांचे रुग्णालय गिफ्ट म्हणून दिले आहे, ते यावर्षी पूर्ण होणार आहे.

