SaReGaMaPa Li'l Champs : सुरेश वाडकर यांनी श्रावणी वागळेला दिलेला शब्द पाळला

सुरेश वाडकर यांनी श्रावणी वागळेला दिलेला शब्द पाळला
सुरेश वाडकर यांनी श्रावणी वागळेला दिलेला शब्द पाळला
सुरेश वाडकर यांनी श्रावणी वागळेला दिलेला शब्द पाळला SaReGaMaPa Li'l Champs
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सारेगमप लिटिल चॅम्प्सच ( SaReGaMaPa Li'l Champs ) पर्व नुकतेच काही महिन्यांपूर्वी संपलं. त्यात उपविजेती ठरलेली गुणी गायिका श्रावणी वागळे हीचं उत्तम गायन ऐकून स्पर्धेतील महागुरू सुरेश वाडकर यांनी तिला एक वचन दिल होत. ते वचन अस होत की, मी स्वतः श्रावणी बरोबर एक नवीन गाणं रिकॉर्ड करीन. आता बोलल्याप्रमाणे सुरेश यांनी दिलेला शब्द पाळला आणि "मन हळवे..." हे गीत रेकॉर्ड करून नुकतेच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहे.

सुरेश वाडकर यांनी दिलेला शब्द पाळला

अनेकदा रिॲलिटी शोमध्ये अनेक मोठी लोक स्पर्धकांची गाणी ऐकून अशी वचनं देतात. परंतु, ती काही वेळा पूर्णत्वास येत नाहीत. मात्र, सुरेश वाडकर यांनी स्वतःहून दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. सारेगमप विजेता आणि सध्या सारेगमपचा संगीत संयोजक आणि मार्गदर्शक असलेला गायक आणि संगीतकार अनिरूद्ध जोशी यानी संगीतबद्ध "मन हळवे.." हे गाणे केले आहे. या गाण्यास सुरेश वाडकर आणि श्रावणी वागळे यांनी आवाज दिला आहे. तर गाण्याचे शब्द ऋचा मुळे यांचे आहेत.

गाण्यामध्ये अक्षय आचार्य यानी संगीत संयोजन केले असून, प्रसाद पाध्ये यांनी तबला, वरद कठापुरकर यानी बासरी तर हर्ष भावसार यानी सक्सोफोन वादन केलं आहे. हे गाणं नुकतेच यूट्यूब चॅनेलवर प्रसिध्द झाले असून गाण्यास रसिकांची पसंती मिळत आहे.

सुरेश वाडकर यांनी श्रावणी वागळेला दिलेला शब्द पाळला
रणदीप हुडांनी पाळला पुनीत बालन यांना दिलेला शब्द..

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news