Sholay Original Climax | तब्बल ५० वर्षांनंतर शोलेचा ओरिजिनल क्लायमॅक्स होणार रिलीज!

Sholay Original Climax - पहिल्यांदाच दिसणार शोलेचा ओरिजिनल एंड
image of amitabh-dharmendra-sanjeev-amjad khan
Sholay Original end public after 50 years Instagram
Published on
Updated on

Sholay Original Climax public after 50 years

मुंबई - हिंदी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे ‘शोले’. १९७५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. गब्बर सिंग, ठाकूर, बसंती आणि सर्वात महत्त्वाचे जय-वीरू हे पात्रे आजही तितकीच लोकप्रिय आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत एक गुपित अनेक वर्षांपासून चाहत्यांमध्ये चर्चेत होतं - त्याचा मूळ क्लायमॅक्स. इतक्या वर्षानंतर आता पहिल्यांदाच ‘शोले’चा ओरिजिनल एंड प्रेक्षकांसमोर आणला जाणार आहे.

image of amitabh-dharmendra-sanjeev-amjad khan
मॉडेल Poonam Pandey ला 'रामलीला' मधून हटवले; एकेकाळी टीम इंडियाच्या विजयावर कपडे उतरवण्याची केली होती घोषणा

इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ सिडनी मध्ये शोलेचा खरा शेवट रिलीज करण्यात येणार आहे. इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ सिडनी (IFFS) ने ही घोषणा केली आहे की, शोले या ऑक्टोबरमध्ये फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षक चित्रपट असेल हे फेस्टिव्हल ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहिल.

image of amitabh-dharmendra-sanjeev-amjad khan
The Bads of Bollywood | ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ जागतिक चौथ्या क्रमांकावर; पण ‘हिरामंडी’ अजूनही पुढे

जेव्हा रमेश सिप्पी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते, तेव्हा चित्रपटाचा शेवट असा व्हावा हा विचार करण्यात आला होता-खलनायक गब्बर सिंहचा मृत्यू ठाकुरच्या हातांनी व्हावा, म्हणजे ठाकुर आपल्या परिवाराचा बदला घेऊ शकेल. पण वितरकांच्या सल्ल्यानंतर क्लायमॅक्स बदलण्यात आला आणि चित्रपटात दाखवण्यात आले की, गब्बरला पोलिस अटक करते. पण, रमेश सिप्पी यांनी एंडिंगचे दोन व्हर्जन शूट केले होते जे आता पहिल्यांदा रिलीज होईल.

म्हणून 'तो' सीन हटवण्यात आला

चित्रपटाच्या डिलीट केलेल्या सीन्समध्ये गब्बर सिंह अहमदला मारतो. पण, हे फारच क्रूर दृश्ये असल्याने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने हा सीन हटवला. शोलेमध्ये गब्बरच्या भूमिकेत अभिनेते अमजद खान तर अहमदच्या भूमिकेत सचिन पिळगावकर होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news