

The Bads of Bollywood debuts at 4th worldwide on Netflix
मुंबई - आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पणातील 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'ला ४ दिवसांत २.८ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत, जे नेटफ्लिक्सवर जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे. जगभरातील टॉप १० सीरीजमध्ये बॅड्स ऑफ बॉलिवूडचा समावेश झाला आहे. ही सीरीज १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. बॅड्स ऑफ बॉलिवूड्समध्ये फक्त ४०-५० मिनिटांचे सात एपिसोड आहेत.
नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्याच्या पहिल्या आठवड्यात २.८ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. नेटफ्लिक्सच्या ग्लोबल चार्ट टॉप १० शोज (non-English) मध्ये या शोची एन्ट्री झालीय. 'वेन्सडे एस-१' (२.१ दशलक्ष) सारख्या प्रसिद्ध टायटलपेक्षा पुढे आहे. पण, 'हिरामंडी'ला ही सीरीज मागे टाकू शकली नाही.
गेल्या आठवड्यात 'वेन्सडे एस-२' ७.२ दशलक्ष व्ह्यूजसह अव्वल स्थानावर आहे. तर 'बॉन अॅपेटिट, युअर मॅजेस्टी' ही ६.५ दशलक्ष व्ह्यूजसह नॉन-इंग्लिश शोजच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. या यादीत 'बॉन अॅपेटिट युअर मॅजेस्टी', 'बिलेनियर्स बंकर' आणि 'द डेड गर्ल्स' देखील आबहेत. 'टू ग्रेव्हज' आणि 'लव्ह इज ब्लाईंड' सारख्या लोकप्रिय शोजच्या पुढे आहे.
२.८ दशलक्ष व्ह्यूव्ज मिळाले असले तरी द बॅड्स ऑफ बॉलिवूडने जागतिक टॉप-१० मध्ये स्थान मिळाले असले तरी, पहिल्या आठवड्यात प्रथम स्थान मिळवणारा भारतीय शो नाही. कारण, त्याने संजय लीला भन्साळींच्या हीरामंडी'ला अद्याप मागे टाकलेले नाही.
या शोमध्ये सहर बम्बा, बॉबी देओल, राघव जुयाल, अन्या सिंग, मोना सिंग आणि मनोज पाहवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत, शिवाय शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, एसएस राजामौली, रणबीर कपूर, रणवीर सिंग, अर्शद वारसी, इमरान हाश्मी आणि इतर अनेक बॉलिवूड स्टार्सचे कॅमिओ आहे.