

Ibrahim Ali Khan shared photo with taimur and jeh
मुंबई - सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खानने सावत्र भावांसोबत (करीना कपूरच्या मुलांसोबत) फोटो शेअर केला खरा. पण या फोटोंच्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. सध्या दिवाळीची धामधूम सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी, बाजारात, घरांमध्ये तर झगमगाच आहे. बॉलिवूडकर देखील मागे नाहीत. बॉलीवुड इंडस्ट्रीतील कलाकार दिवाळीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला आहे. सेलिब्रिटींनी आपल्या परिवार आणि नातेवाईकंसोबत दिवाळी साजरी करताना दिसत आहेत.
दरम्यान, सैफ अली खानच्या लाडल्याने इब्राहिम अली खानने दिवाळीच्या आधी फॅन्सना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच आपल्या भावासोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
इब्राहिम अली खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या दोन्ही सावत्र भाऊ तैमूर अली खान - जहांगीर अली खान (जेह) सोबत दिसत आहेत. फोटोमध्ये इब्राहिम ब्लॅक शेरवानीमध्ये हँडसम दिसत आहे. तर तैमूर रेड कलर कुर्तीमध्ये दिसत आहे. तर फोटोमध्ये जेह खट्याळपणा करताना दिसतोय. क्यूट फोटो शेअर करताना इब्राहिमने कॅप्शनमध्ये लिहिलं, "तीनों भाई तीनों तबाही हॅप्पी दिवाली."
या फोटोंवर युजर्सच्या कॉमेंट्सचा पूर आला आहे. एका युजरने लिहिले, 'तिन्ही क्युटीज एका फ्रेम मध्ये.' दुसऱ्याने लिहिलं, 'सैफ अली खान प्रो+सैफ अली खान लाइट+ करीना कपूर खान प्रो.' अशाच प्रकारच्या अन्य अनेक युजर्सनेदेखील कॉमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इब्राहिम अली खान, सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहचा मुलगा आहे तर तैमूर आणि जेह, सैफची दुसरी पत्नी करीना कपूरची मुले आहेत.