

परिणिती चोप्रा आणि राघव चड्डा यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच रजत शर्मा यांच्या 'आप की अदालत' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी त्यांच्या खासगी आयुष्यावर भाष्य केले. त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राघव म्हणाले की, मला वाटते की, आमचे वैवाहिक आयुष्य चांगलं चालले आहे, कारण मला बॉलीवूडचा 'बी' ही येत नाही आणि परिणितीला पॉलिटिक्सचा 'पी'ही येत नाही. त्यामुळे आमची गाडी खूप नीट चालली आहे. आम्ही आनंदी वैवाहिक जीवन जगत आहोत. ती खूश आहे. आम्ही तडजोड करतो. मी माझी चूक मान्य करतो आणि ती माझ्याशी सहमत होते की हो, चूक तुमचीच होती. यामुळे सर्व समस्या ठीक होतात. वैवाहिक आयुष्याचा एक मंत्र आहे, तुम्ही ते समजून घेतलात तर तुमचे लग्न खूप यशस्वी ठरेल. तो मंत्र म्हणजे 'हॅप्पी वाईफ इज हॅप्पी लाईफ !' यामध्ये एक व्यक्ती नेहमी सोबत असते. राघवच्या वक्तव्यानंतर परिणिती नाराज झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर नेटकरी नाराज झाले आहेत. एक युजर म्हणतो की, आता एका गोष्टीची जाणीव होऊ लागली आहे की, पैशाने दर्जा विकत घेतला जाऊ शकत नाही.'