Sachin Pilgaonkar: माझ्यावरच्या मीम्सवर मीही हसतो अन् मित्रांना फॉरवर्डही करतो; ट्रोलिंगवर सचिन यांचे जबरदस्त उत्तर

सचिन पिळगावकर यांनी त्‍यांच्यावर ट्रोलिंग करणाऱ्यांना म्हणाले एकच करा..
Sachin Pilgaonkar
Sachin PilgaonkarPudhari
Published on: 
Updated on: 

Sachin Pilgaonkar on Online Trolling Memes

मुंबई : मीम्स वगैरे काही गोष्टी हुमरस असतात आणि त्याच्यावरती मीही हसतो मीही माझ्या मित्रांना ते फॉरवर्ड करतो मला परमेश्वर कृपेने सेन्स ऑफ हुमर आहे विनोद बुद्धी शाबुत आहे. त्यामुळे मला स्वतःवर सुद्धा हसायला खूप आवडत. कारण मला असं वाटतं माझ्यावर त्याचे संस्कार झालेले आहेत. त्यांनी मला शिकवलेल आहे की माणूस जेव्हा स्वतःवर हसायला शिकतो किंवा स्वतःवर हसू शकतो त्याची विनोद बुद्धी खूप हेल्दी असते अशी भावना जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली. अमुक तमूकच्या पॉडकास्टमध्ये त्‍यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Sachin Pilgaonkar
“मी काही ट्रॅव्हल एजंट नाही”; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याच्या प्रश्नावर शशी थरूर यांचे सडेतोड उत्तर

सध्याच्या जगात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. तंत्रज्ञान बदलत आहे. मनोरंजन क्षेत्रातही नवनवे तंत्रज्ञान येत आहे. त्‍यामुळे त्‍या बदलाला आपणालाही सुसंगत सामोरे जावे लागणार आहे. त्‍याच्याशी जुळवून घ्यावं लागणार आहे. ते शिकावं लागणार आहे. काहींच्या दृष्टीने एआय चांगले आहे. काहिंसाठी ते चांगले नसेल पण काळानुसार आपणालाही बदल स्विकारूनच ते तंत्रज्ञान अवगत करून पुढ जावं लागणार आहे असं सचिन पिळगावकर म्हणाले.

या पॉडकास्टमध्ये सचिन पिळगावकर यांना त्‍यांच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवर विचारण्यात आले. तेंव्हा ते म्हणाले काही मीम्स करेक्ट आणि चांगला असतो आणि तो कुठेतरी मला सापडला माझ्यात की अरे माझ्यात पण असं आहे की मी पण स्वतःवरती खूप हसू शकतो. त्यामुळे हे जे मीम्स वगैरे सगळे म्हणतायत ना काही काही गोष्टी ह्युमरस असतात आणि त्याच्यावरती मीही हसतो. मीही माझ्या मित्रांना ते फॉरवर्ड करतो, पण काही काही शिव्या गाळ किंवा अशा प्रकारच्या थोड्याशा लेव्लच्या खालच्या गोष्टी असतात. त्या मग मी एन्जॉय नाही करत कारण मीही माणूस आहे.

Sachin Pilgaonkar
Tiger Shroff firing Case| टायगर श्रॉफवर गोळीबारानंतर आई आयशा श्रॉफ यांची पोस्ट चर्चेत; म्हणाल्या.. माझ्या मुलाला बजरंगबलीने वाचवले!

सुरूवातीला माझ्यावरचे मीम्स येत होते तेंव्हा मला ते नवीन होतं. थोड शॉकिंग होतं त्रासदायक नव्हतं. मग असं वाटू लागलं की अरे हे काय सुरू झालंय. कारण माझ्या चित्रपटात अस काही नसतं. प्रेक्षकांना तस काही द्यायच नाही.

कॉमेंट्स आणि या अशा प्रकारच्या निगेटिव्हिटी वगैरे गोष्टी हे लॉंग लास्टिंग कधीच नसतं. तुम्हाला जर लॉंग लास्टिंग काहीतरी पाहिजे असेल तुमच्या आयुष्यात तर तुम्हाला कॉन्टेंट चांगलं क्रिएट केलं पाहिजे ते लॉंग लास्टिंग असतं किंवा आयुष्यभर पुरणार असतं या गोष्टी आयुष्यभर पुरणार नाहीत. याची जाणीव झाली तर आयुष्यात गंमत आहे.

पुढे बोलताना पिळगावकर यांनी तरुणांना उद्देशून म्हटले की, ही पोर जी आहेत ना सगळी सगळी यंगस्टर आहेत त्यातली काही डॉक्टर्स वगैरे पण असतील कदाचित शिकली सवरलेली पण असतील पण ती माझ्याकरता पोर आहेत. माझ्या वयामुळे वडील म्हणून मला ती माझी पोरं वाटतात आणि मी त्यांना आशीर्वाद देऊ इच्छितो आणि मी त्यांना असा आशीर्वाद देऊ इच्छितो की तुम्ही हे करताय करा. आता तुमच्या पावल्या वेळात तुम्हाला तसं करावसं वाटत करा. बट द सेम टाईम असं काहीतरी सुद्धा आयुष्यात करा की जे तुमच्याबरोबर आयुष्यभर राहील हे नाही राहणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news