“मी काही ट्रॅव्हल एजंट नाही”; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याच्या प्रश्नावर शशी थरूर यांचे सडेतोड उत्तर

देशात विरोधकांची आंदोलने सुरू असतानाच राहुल गांधी परदेशात गेल्याचा भाजपचा आरोप
shashi tharoor news
“मी काही ट्रॅव्हल एजंट नाही”; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याच्या प्रश्नावर शशी थरूर यांचे सडेतोड उत्तरfile photo
Published on: 
Updated on: 

i am not a travel agent shashi tharoor sharp retort asked about rahul gandhi foreign trip

पुढारी ऑनलाईन : राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याबाबत केरळमध्ये पत्रकारांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांना प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि सडेतोड उत्तर दिले. थरूर म्हणाले, “मी काही ट्रॅव्हल एजंट नाही. मला हा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नाही.”

shashi tharoor news
Tiger Shroff firing Case| टायगर श्रॉफवर गोळीबारानंतर आई आयशा श्रॉफ यांची पोस्ट चर्चेत; म्हणाल्या.. माझ्या मुलाला बजरंगबलीने वाचवले!

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पत्रकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यांनी आपण “काही ट्रॅव्हल एजंट नाही”, असे स्पष्ट केले.

शशी थरूर त्या वेळी केरळमध्ये होते. पत्रकारांनी त्यांना राहुल गांधी परदेशात का गेले आहेत, असा प्रश्न विचारला. यावर कोणतीही टिप्पणी करण्यास नकार देत थरूर म्हणाले, “मी काही ट्रॅव्हल एजंट नाही. मी दिल्ली सोडून येथे का आलो आहे, हा प्रश्न मला विचारण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या काही जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे मी यावर कोणतीही टिप्पणी करू शकत नाही.”

shashi tharoor news
Tiger Shroff firing Case| कोटानंतर दिल्लीतही अटकसत्र सुरू, ४ जणांना अटक

भाजपने काय आरोप केले आहेत?

देशात विरोधकांची आंदोलने सुरू असतानाच राहुल गांधी चार दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. यापूर्वीही भाजपने राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राजकीय संघर्षाच्या काळात या दौऱ्यांचा मुद्दा उपस्थित करून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे.

भाजपने आरोप केला की, दिल्लीत आंदोलनादरम्यान वारंवार खोटे बोलून थकल्यानंतर राहुल गांधी सुट्टी घालवण्यासाठी निघून गेले. पक्षाने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कथितरीत्या राहुल गांधी व्हिएतनामला जाणाऱ्या विमानात बसलेले दिसत आहेत.

भाजपने प्रश्न उपस्थित केला, “राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांचा नेमका अजेंडा काय आहे?” भाजपचे नेते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर सत्तापालटाचा कट रचल्याचा आरोप केला. तसेच ते “जॉर्ज सोरोस यांच्याकडून धडे घेण्यासाठी” परदेशात गेले असल्याचा दावाही त्यांनी केला.

संबित पात्रा म्हणाले, “त्यांचे आका आणि सूत्रधार राहुल गांधी परदेशात गेले होते, जेणेकरून जॉर्ज सोरोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून भारताचे नुकसान कसे करायचे, सत्तापालट कसा घडवून आणायचा आणि त्यांच्याकडून नेमक्या कुठे चुका झाल्या, हे शिकता येईल.

“त्यांनी सर्व शक्य प्रयत्न केले, मात्र भारतातील जनतेने त्यांना साथ दिली नाही. आता त्यांचे संपूर्ण लक्ष पुढे काय करायचे आणि हा अजेंडा कसा पुढे न्यायचा, यावर केंद्रित आहे. जेणेकरून भारत विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचेल आणि येथे सत्तापालट घडवून आणता येईल.”

भाजपच्या आरोपांना काँग्रेसने दिले उत्तर

भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारला की, ते परदेशात सुट्टी घालवण्यासाठी गेले आहेत की अराजकता पसरवणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले आहेत?

या प्रश्नावर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी राहुल गांधी यांची बाजू घेतली. राहुल गांधी यांच्याही काही जबाबदाऱ्या आहेत, असे त्यांनी सांगितले. संदीप दीक्षित म्हणाले, “इतर लोक अशा प्रकारे परदेश दौरे करत नाहीत का? राहुल गांधी हे एक व्यक्ती आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत. ते येल विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, लंडनमध्ये विद्यार्थ्यांना भेटतात आणि तेथील बुद्धिजीवींशी चर्चा करतात. ते प्रसारमाध्यमांना मुलाखतीही देतात असे काम पंतप्रधान करत नाहीत. मग भाजपला याचा त्रास का होतो आहे?”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news