.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : हृतिक रोशन - सबा आजाद यांचं नातं सर्वश्रुत आहे. आता तिने एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्याने तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात अंगठी दिसते. शिवाय तिने लक्षवेधी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे हृतिक रोशन सोबत ती लवकरच विवाह बंधनात अडकेल, असा तर्क लावला जात आहे. सबा आजाद या ना त्या कारणाने आणि हृतिक सोबतच्या रिलेशनशिपमुळे लाईमलाईटमध्ये राहते. हे लव्हबर्ड कधी रोमँटिक डिनर डेट वर तर कधी बॉलीवूड पार्टी वा आउटिंगमध्ये स्पॉट होतात. आता तिने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केल्याने ती लवकरच विवाहबंधनात अडकेल, असे म्हटले जात आहे.
गुरुवारी, सबा आजादने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. तिने आपल्या रिंग फिंगरमध्ये एक मेटालिक रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिने पोस्टवर कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘रिवीलिंग सून’, ज्यावर बॉयफ्रेंड हृतिक रोशनने कॉमेंट करत लिहिले की, ‘प्रतीक्षा करू शकत नाही’. पण, दोन्ही कलाकारांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. ही पोस्ट एखाद्या अपकमिंग इवेंट वा प्रोजेक्टसाठी असू शकते.
हृतिक रोशन - सबा आजादची पहिली भेट एका म्युचुअल फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यांची भेट झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि मग प्रेम झाले. अनेकदा ते लपून-छपून एखमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपले नाते ऑफिशियल केलं होतं. आता लवकरचं ते आपले नाते कन्फर्म करणार आहेत.