Hrithik Roshan-Saba Azad: ऋतिक-सबाचा ब्रेकअप झाला? डेटिंग ॲपवर 'हँडसम हंक'ची प्रोफाईल व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण

Hrithik Roshan-Saba Azad: ऋतिक-सबाचा ब्रेकअप झाला? डेटिंग ॲपवर 'हँडसम हंक'ची प्रोफाईल व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण
Hrithik Roshan-Saba Azad
सबा आजाद-हृतिक रोशन Instagram
Published on
Updated on

बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता ऋतिक रोशन पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. ऋतिक आणि अभिनेत्री सबा आजाद गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. दोघेही अनेकदा पार्टी, सुट्ट्या आणि विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. सोशल मीडियावरही ते एकमेकांसोबतचे फोटो आणि पोस्ट शेअर करताना दिसतात. मात्र, आता त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना वेग आला आहे.

ऋतिक आणि सबा यांच्या ब्रेकअपच्या चर्चेमागे एका डेटिंग अॅपचा संदर्भ दिला जात आहे. सेलिब्रिटी डेटिंग अॅपवर ऋतिक रोशनच्या नावाने प्रोफाईल असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या कथित प्रोफाईलचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याने ऋतिक आणि सबा यांच्या नात्यात दुरावा आला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Hrithik Roshan-Saba Azad
CM Vijay-Trisha Krishnan|स्वातंत्र्यदिन सोहळ्यात विजय यांच्या पालकांसोबत त्रिशा कृष्णनची उपस्थिती, पिवळ्या साडीत वेधले लक्ष

व्हायरल प्रोफाईलमुळे चर्चांना सुरुवात

सोशल मीडियावर समोर आलेल्या स्क्रीनशॉटमध्ये ऋतिकच्या प्रोफाइलच्या बायोमध्ये ‘अॅक्टर, प्रोड्यूसर, एंटरप्रेन्योर’ असा उल्लेख असल्याचे दिसत आहे. हे स्क्रीनशॉट समोर आल्यानंतर ऋतिकच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले. मात्र, या प्रोफाईलबाबत ऋतिक रोशन किंवा सबा आजाद यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे डेटिंग अॅपवरील हे प्रोफाईल खरोखर ऋतिकचेच आहे की नाही, याबाबतही माहिती मिळालेली नाही.

Hrithik Roshan-Saba Azad
Amruta Khanvilkar's film Rakta Phal |अमृताचा नवा कोरा चित्रपट 'रक्तफळ', गोव्याची नाईटलाईफ, वेलनेस टुरिझम अन्‌ बरंच काही...

ऋतिक आणि सबा यांच्या नात्याची चर्चा फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झाली होती. त्यानंतर दोघे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. सुट्टीसाठी परदेशात जाण्यापासून ते बॉलिवूडमधील पार्ट्यांमध्ये सहभागी होण्यापर्यंत तसेच बर्थडे सेलिब्रेशनपर्यंत दोघे एकत्र पाहायला मिळाले होते.

ऋतिकच्या वैयक्तिक आयुष्यावर एक नजर

ऋतिक रोशनने वर्ष २००० मध्ये सुजैन खानसोबत विवाह केला होता. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, २०१४ मध्ये ऋतिक आणि सुजैन यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर काही वर्षांनी ऋतिकच्या आयुष्यात सबा आजाद आली. सबा आणि ऋतिक यांच्यात वयाचे अंतर असले तरी दोघेही एकमेकांसोबत चांगले बॉन्डिंग शेअर करत असल्याचे अनेकदा दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news