

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके ‘रक्तफळ’ चित्रपट घेऊन येताहेत. अमृता खानविलकरने याबद्दल पोस्ट केलीय. रक्तफळ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत तिने ही माहिती दिलीय.
मॅड फँटसी-कॉमेडी-थ्रिलर हा चित्रपट गोव्यातील नाईटलाईफ, वेलनेस टुरिझम आणि तरुणाईच्या महत्त्वाकांक्षा कथा घेऊन येत आहेय यामध्ये उपेंद्र लिमये, अमृता खानविलकर, गौरी नलावडे, केतकी कुलकर्णी, मयूर मोरे आणि आदित्य ठाकरे कलाकार आहेत.
सुजय डहाके ‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’ हे ते दोन चित्रपट आणणार आहेत. दोन्ही चित्रपटांचे मुख्य चित्रीकरण पूर्ण झाले असून सध्या ते पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहेत. लवकरच या चित्रपटांच्या प्रमोशनल प्रक्रियेला सुरुवात होणार असून, सप्टेंबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत त्यांचे चित्रपटगृहात प्रदर्शन होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘तुझ्या आयला’ हा सुजय डहाके दिग्दर्शित हा भावनिकदृष्ट्या प्रभावी चित्रपट असून, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि मुरलीधर छतवानी; सुनील जैन, आदित्य जोशी आणि मोहित अरोरा, राजेश सिंह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मेघना प्रमाणीकर सहनिर्मित या चित्रपटात राजश्री देशपांडे, संभाजी भगत आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘तुझ्या आयला’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
‘रक्तफळ’ हा आधुनिक तरुणाईच्या भावनिक विरोधाभासांचा वेध घेणारा हा समकालीन, युवा-केंद्रित ‘मॅड फँटसी-कॉमेडी-थ्रिलर’ आहे. उपेंद्र लिमये, अमृता खानविलकर, गौरी नलावडे, केतकी कुलकर्णी, कोटा फॅक्टरी फेम मयूर मोरे आणि इन्फ्लुएन्सर आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
‘रक्तफळ’ चित्रपटाचे गोव्यातील ४० दिवसांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून ते फेब्रुवारी–मार्च २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.