Vanita Kharat : वनिता खरातने ८ महिन्यांत २९ किलो वजन कसं कमी केलं? डाएटबाबत म्हणाली..

एका मुलाखतीमध्ये वनिताने आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाची दिली माहिती.
Vanita Kharat
Vanita Kharat : वनिता खरातने ८ महिन्यात २९ किलो वजन कसं कमी केलं? डाएटबाबत म्हणाली..file photo
Published on: 
Updated on: 

How did Vanita Kharat lose 29 kg in 8 months? What changes did you make in the diet?

पुढारी ऑनलाईन : वनिताने कोणतीही जीम न लावता आठ महिन्यात तब्बल २९ किलो वजन कमी केलंय. तिच्यातला हा बदल पाहून तीचे चाहतेही थक्क झाले आहेत. नुकत्‍याच एका मुलाखतीमध्ये तीने आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाची माहिती आपल्या चाहत्‍यांसोबत शेअर केली आहे.

Vanita Kharat
Sachin Pilgaonkar: माझ्यावरच्या मीम्सवर मीही हसतो अन् मित्रांना फॉरवर्डही करतो; ट्रोलिंगवर सचिन यांचे जबरदस्त उत्तर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात सध्या तीने केल्या वेट लॉसमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. वनिता तीचे वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असते. वनिताने राजश्री मराठी ला मुलाखत दिली. ती म्हणाली मी जीम लावली नाही. कारण जीम लावली असती तर मला रोज तेच करून कंटाळा आला असता. म्हणून मी वेगळ्या पद्धतीने वर्कआउट केलं. मी याआधी कधीच लाठीकाठी शिकले नव्हते. मुदगल मी कधीच फिरवलं नव्हतं. नान चाकू मी शिकत आहे. मला जिना चढतानाही दम लागायचा आता मी १० किमी पर्यंत धावते.

माझ्यातली ताकद कमी झाल्याच मला जाणवायचं. माझे पाय सुजायचे खूप वेळ उभ राहिलं की माझी पाठ दुखायची. मला खाली मांडी घालून बसता येत नव्हतं. तिशीत मला हे सगळं होतंय पुढे जरा कठीण आहे. म्हणून मी म्हटलं काहीतरी करून बघुया. मी फेब्रुवारीमध्ये वेट लॉस करायला सुरूवात केली. काही किलो वजन कमी केल्यावर मला डॉक्टरांनी तू वर्कआउट करू शकतेस असं सांगितलं.

मी आळशी होते

मी आळशी होते. ट्रेनर ओंकार जाधव आयुष्यात आल्यावर मी रोज दीड ते दोन तास वर्कआउट करते. आता आठ महिन्यात २९ किलो वजन कमी केलंय आणि अजुन ९ किलो कमी करायचं आहे अस ती म्हणाली.

Vanita Kharat
Tiger Shroff firing Case| कोटानंतर दिल्लीतही अटकसत्र सुरू, ४ जणांना अटक

पुढे वनिताने सांगितलं की, मला इन्स्टावर मेसेज येतात. तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते असे मेसेज येतात. ही गोष्ट खूप छान आहे. माझ्यासारखी आळशी मुलगी कोणासाठी प्रेरणा बनलीय हा बदल छान वाटतो. मला स्वत: ला स्क्रीनवर बघताना भारी वाटतंय. सेटवर माझं कौतुक होतंय अशी भावना वनिताने व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news