Housefull 5 Top 5 Actress | अक्षयसोबत 'हाऊसफुल-५' मध्ये 'या' ५ अभिनेत्रींची लागली वर्णी

एकापेक्षा एक सर्रस ५ अभिनेत्री अक्षय कुमारसोबत...
 Housefull 5 actress
हाऊसफुल ५ मध्ये या पाच अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - कॉमेडी ड्रामा चित्रपट हाउसफुल ५ चे शूटिंग १५ सप्टेंबर रोजी लंडनमध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटाचे शेड्यूल ४५ दिवसांचे असेल. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात पाच तगड्या अभिनेत्रींची अदाकारी पाहायला मिळणार आहे.

साजिद नाडियाडवाला आणि अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित कॉमेडी ड्रामा हाऊसफुल-५ येणार आहे. त्याची अधिकृत घोषणा आधीच झालेली आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावर त्याची घोषणा केली होती.

अक्षय कुमारसोबत 'या' कलाकारांच्या भूमिका

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हाऊसफुल ५ एक क्रुजवर सेट केलं जाईल. असं म्हटलं जात आहे की, यावेळी हाऊसफुल ५ हा आतापर्यंतच्या फ्रेंचायजीपेक्षा सर्वात मोठा चित्रपट असेल. निर्माता साजिद नाडियाडवाला मोठ्या कलाकारांना घेऊन हा चित्रपट आणत आहेत. चित्रपटामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, डिनो मोरिया यांच्या भूमिका आहेत.

'या' पाच तगड्या अभिनेत्रींच्या भूमिका 

हाऊसफुल-५ मध्ये पाच अभिनेत्री दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी हाऊसफुलच्या पाचव्या फ्रेंचायझीमध्ये जॅकलीन फर्नांडिस, नरगिस फाखरी, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंह, सौंदर्या शर्मा यांच्या मुख्य भूमिका असणार आहे.

 Housefull 5 actress
Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या 'भूलभुलैया ३' ची रिलीज डेट आली समोर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news