

बंगाली अभिनेता व आमदार हिरन चॅटर्जी यांच्या दुसऱ्या लग्नाबाबत समोर आलेल्या रिपोर्ट्समुळे सध्या मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्या मुलीच्या वयाच्या एका मॉडेलसोबत विवाह केल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेषतः त्यांच्या मुलीने केलेल्या कथित वक्तव्यामुळे हा वाद अधिकच चिघळला असून, हिरन चॅटर्जी यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
mla actor Hiran Chatterjee second marriage with model
आमदार आणि अभिनेते असलेले हिरन चॅटर्जी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढल्याने चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे पहिल्या पत्नीकडून गंभीर आरोप लागत असतानाच दुसरीकडे त्यांची १९ वर्षांच्या मुलीचे स्टेटमेंटही चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे आमदाराने आपल्या मुलीच्या वयाच्या एका मॉडेलशी दुसरे लग्न केल्याने हे प्रकरण चांगलेच गाजत आहे.
अभिनेता हिरन चटर्जी यांनी वाराणसीमध्ये मॉडल रितिका गिरी सोबत गुपचुपपणे विवाह केला. एका खासगी समारोहात पार पडलेल्या या लग्नाची चर्चा तर हतेच पण त्यांना वैयक्तीक आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागत आहे.
हिरन यांच्या दुसऱ्या लग्नाच्या वृत्तानंतर त्यांची पहिली पत्नी अनिंदिता चॅटर्जी आणि मुलगी नियासा चॅटर्जी यांचे स्टेटमेंट समोर आले आहेत
हिरन चटर्जी यांच्या पहिल्या पत्नी अनिंदिता चॅटर्जी यांनी म्हटले आहे की, त्यांच्यात अद्याप कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. हे लग्न बेकायदेशीर आहे. घटस्फोट प्रलंबित असतानाच दुसरे लग्न केल्यामुळे अनिंदिता यांनी हिरन यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये तिने अभिनेत्यावर तिचा "छळ" केल्याचा आणि कायदेशीररित्या घटस्फोट न घेता रितिकाशी लग्न केल्याचा आरोप केला. अनिंदिता यांना त्यांच्या नात्याबद्दल बऱ्याच काळापासून माहिती होती असा दावा रितिकाने केला. हिरन यांची मुलगी नियासाने तिच्या आईला जाहीरपणे पाठिंबा देत वडील म्हणून हिरन अपयशी ठरले असल्याचे म्हटले आहे.
नियासा ही हिरन यांची १९ वर्षांची मुलगी आहे. तिला वडिलांच्या लग्नाबद्दल कोणत्याही प्रकारे कल्पना नाही. तिला या लग्नाबद्दल सोशल मीडियावरील फोटोंद्वारे समजले. तिने सार्वजनिकरीत्या आपल्या वडिलांवर टीका केलीय
कोण आहे रितिका गिरी?
रितिका गिरी एक मॉडल आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिलंय की, ती बियॉन्डयू मिस इंडिया २०२२ मध्ये सहभागी झाली होती. रितिका मिस. ईस्ट इंडिया २०१९ ची विजेती आहे. ती योगामध्ये नॅशनल गोल्ड मेडलिस्ट देखील आहे.
रितिका गिरीने केला हा दावा?
दुसरी पत्नी रितिका गिरीने असा दावा केला आहे की, अनिंदिता यांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती तसेच त्यांना घटस्फोटाची नोटीस देखील पाठवण्यात आली होती. दुसरीकडे, मात्र, अनिंदिता यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. रितिका खोटे बोलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.