Border 2 Opening Collection | बॉर्डर-२ चे जबरदस्त ओपनिंग, भारतासह वर्ल्डवाईड छप्परफाड कमाई

Border 2 Opening Collection | भारतच नाही तर वर्ल्डवाईड ‘बॉर्डर 2’ ची छप्परफाड कमाई
image of border 2 poster
Border 2 Opening Collection instagram
Published on
Updated on

Border 2 Box Office Collection Day 1

बॉर्डर-२ चित्रपट २३ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे आणि त्याने बॉक्स ऑफिसवर त्याची सुरुवात चांगली केली आहे. "बॉर्डर २" ने अॅडव्हान्स बुकिंगमधून आधीच १२.५० कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाने भारतासह जगभरात जबरदस्त कमाई केलीय.

धुरंधर, छावाला बॉर्डर २ च्या ओपनिंग ला टाकले मागे

बॉर्डर २ या वर्षाचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. छावा, ज्याने ३३ कोटींचे ओपनिंग केले होते. आणि धुरंधरने २८ कोटींचे ओपनिंग केले होते. या दोन्ही चित्रपटांना बॉर्डर २ ने पछाडले आहे.

पहिल्या दिवशीचे बॉर्डर २ चे बॉक्स ऑफिस ओपनिंग

मीडिया रिपोर्टनुसार, सनी देओल स्टारर बॉर्डर २ ने पहिल्या दिवशी भारतात ३० कोटींचे कलेक्शन झाले आहे. वर्ल्डवाईड आकडा ३९ कोटी पोहोचला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पदार्पणापूर्वीच २०० कोटी रुपये कमावले आहेत. त्याचे बजेट २७५ कोटी असल्याचे म्हटले जाते.

image of border 2 poster
Kamaal R Khan Arrest: गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल खानला अटक; सुरूवातीला चाचपडणारे पोलीस कसे पोहचले KRK पर्यंत?

'बॉर्डर २' हा त्याच नावाच्या २९ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. "बॉर्डर २" चे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, मोना सिंग, सोनम बाजवा, अन्या सिंग आणि परमवीर चीमा यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट टी-सीरीज आणि जेपी दत्ता यांनी तयार केला आहे.

image of border 2 poster
Oscars Nominations 2026 | ‘सिनर्स’ला 16 मानांकने; ‘टायटॅनिक’, ‘ला ला लँड’चा विक्रम मोडला

विकेंडचा फायदा

चित्रपटाला शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिनी हॉलिडेचा फायदा होण्याची शक्यता आहे. चित्रपट समीक्षकांकडून चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचून आणेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news