

दोन लावणी नृत्यांगनांचा भव्य सामना एका मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हिंदवी पाटील आणि शुरेक्हा कुदाची या दोन दिग्गज नृत्यांगनांचा लावणी नृत्याच्या माध्यमातून होणारा संघर्ष प्रेक्षकांना थरारक अनुभव देईल. चित्रपटाच्या कथेत या नृत्यांगनांमध्ये होणारा लावणी नृत्याचा मुकाबला आणि त्यांचे अभिनय कौशल्य एक अप्रतिम असणार आहे.
Hindavi Patil and Surekha Kudachi lavni upcoming marathi movie
आगामी मराठी चित्रपटातून दोन लावणी नृत्यांगना फड गाजवायला सज्ज आहेत. अभिनेत्री, नृत्यांगना सुरेखा कुडची तर दुसरीकडे हिंदवी पाटील अशा दोन नृत्यांगनांची बहारदार लावणी पाहायला तयार राहा. या दोघी नृत्यांगना जब्राट या चित्रपटात दिसणार आहेत. ‘जब्राट’मध्ये दोघींची एक फक्कड लावणी पाहायला ६ फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या लावणीची झलक इन्स्टग्रामवर पाहायला मिळतेय. दोन्ही नृत्यांगनांची ठसकेबाज लावणी पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.
डॉ. जयभीम शिंदे लिखित -
''किती सावरू पुन्हा पुन्हा
कशा झाकू या खाणाखुणा
नाही बिचाऱ्या पदराचा या गुन्हा''
असे बोल लावणीचे आहेत. बेला शेंडे यांचे स्वर आहेत. डॉ. जयभीम शिंदे यांचे संगीत आहे तर नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले आहे.
‘जब्राट’ चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी, प्रगती कोळगे, छायांकन- अनिकेत खंडागळे, सहाय्यक असोशीएट- चार्लेस गोम्स, वेशभूषा- युगेशा ओमकार आहेत. बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदेश उमप, डॉ. जयभीम शिंदे, अनुराग जगदाळे, स्वराज्य भोसले, राजनंदिनी मगर, स्वाती शिंदे यांचा स्वरसाज गाण्यांना आहे.