हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरमुळे कापावे लागले केस; धाय मोकलून रडली आई

हिना खानचा कॅन्सरवरील संघर्ष: केस कापताना आईचे भावूक क्षण
Hina Khan treatment for breast cancer
हिना खानने आपले केस कापले Hina Khan Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. कीमोथेरपीसाठी ती रुग्णालयात दाखल झाली होती. तिने हॉस्पिटलच्या बेडवरून एक व्हिडिओ शेअऱ केला होता. आता आणखी दोन व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिचा न्यू लूक दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिने सांगितलेलं की, तिच्या तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर आहे. हिना तेव्हापासून सोशल मीडियावर आपली हेल्थ अपडेट शेअर करत राहते. आता हिनाने नवा व्हिडिओ शेअर केला आहे.

Hina Khan treatment for breast cancer
'सुख कळले' मालिकेत आशय कुलकर्णीची दमदार एन्ट्री!

हिना खानने लांबसडक केस कापले

हिनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हिना कशाप्रकारे आपले लांब केस कट करत आहे, हे दिसते. कॅन्सरमध्ये जेव्हा कीमोथेरेपी होते, तेव्हा केस गळतात. त्या दरम्यान, तिची आईदेखील खूप भावूक होते.

Hina Khan treatment for breast cancer
'तू भेटशी नव्याने’ : एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी

हिना खानच्या आईचे रडून बेहाल

व्हिडिओमध्ये हिना खुर्चीवर बसलेली दिसते. ती आपल्या आईला सांगते की, रडू नकोस. केस तर कट करत आहे. ते पुन्हा येतील. तू देखील खूपदा केस कट केले आहेस, ते पुन्हा आलेच ना! पण तिची आई रडत राहते. तेव्हा हिनाचा बॉयफ्रेंड रॉकीचा आवाज येतो, तो म्हणतो आंटी आता रडणे बंद करा. ती म्हणते की मी, प्रार्थना करत आहे. हिनाचे केस कट झाल्यानंतर तिचा बॉयकट दिसतो आहे.

Hina Khan treatment for breast cancer
सोनाक्षी सिन्हा-रितेश देशमुखच्या 'काकुडा' चित्रपटाचा ट्रेलर

हिना शेवटी आपाल नवा लूक पाहून खुश होते. तिची आई, बॉयफ्रेंड आणि टीमचे मेंबर्स तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. तर आई गळाभेट घेते. हिनाने व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, 'माझी आई कश्मीरीमध्ये रडत प्रार्थना करत ऐकू शकता बॅकग्राऊंडमध्ये....'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news