Hera Pheri Movie: हेराफेरी सिनेमा म्हणजे या सिनेमाची कट टू कट कॉपी; 25 वर्षानंतर खुद्द दिग्दर्शकाने सांगितले सत्य

सिनेमाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी अलीकडेच एका मुलाखती दरम्यान ही बाब उघड केली
Entertainment
हेराफेरी सिनेमा pudhari
Published on
Updated on

भारतीय सिनेमाच्या लोकप्रिय सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे हेराफेरी. कॉमेडी सिनेमांच्या यादी काढली तर हेराफेरीचे नाव विसरून चालणार नाही. बाबुराव आपटे, राजू, श्याम या त्रिकूटाने भारतीय सिनेरसिकांना भरभरून हसवले आहे. अगदी अलिकडेपर्यंत या सिनेमातील डायलॉग्सवर मीम्स बनत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? हा सिनेमा म्हणजे एका सिनेमाची कट टू कट कॉपी असल्याचे खुद्द दिग्दर्शकानेच सांगितले आहे. सिनेमाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी अलीकडेच एका मुलाखती दरम्यान ही बाब उघड केली. (Latest Entertainment News)

काय म्हणाले प्रियदर्शन?

प्रियदर्शन या सिनेमाबाबत बोलताना पुढे म्हणतात, की जेव्हा कधी ते रिमेक बनवतात त्यावेळी ते कलाकारांना तो ओरिजिनल सिनेमा दाखवत नाहीत. त्यांना असे वाटते की प्रत्येक कलाकाराची बॉडी लँग्वेज वेगळी असते. त्यामुळे रिमेकमधील प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वत:च्या अंगाने फुलायला वाव मिळतो.

Entertainment
Robo Shankar Wife: पतीच्या अंत्ययात्रेत बेभान होऊन नाचताना दिसली रोबो शंकरची पत्नी; नेटीझन्स म्हणाले असेही दु:ख असते का?

पण हेराफेरी म्हणजे पूर्णपणे कॉपी

पण या सगळ्यामध्ये त्यांनी हे देखील शेयर केले की एक सिनेमा असाही आहे की जो त्यांनी पूर्णपणे कॉपी केला होता. ते स्पष्ट म्हणाले की, ‘ मी कधी कोणत्या सिनेमाला फ्रेम टू फ्रेम कॉपी केले नाही. पण हेराफेरी याला अपवाद आहे. त्याचे सगळे डायलॉगदेखील कॉपी केले गेले होते. ते हिन्दीमध्ये भाषांतरित करून हा सिनेमा रिलीज केला गेला होता.

ओरिजिनल सिनेमा कोणता होता?

  • हेराफेरी हा मल्याळी सिनेमा रामजी राव स्पीकिंगचा रिमेक होता.

  • रामजी राव स्पीकिंगमध्ये कुणाच्या भूमिका होत्या?

  • या सिनेमात विजय राघवन हे मुख्य भूमिकेत होते. याशिवाय साई कुमार, मुकेश हे मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा 1989 मध्ये रिलीज झाला होता.

Entertainment
Subodh Bhave: या प्रसिद्ध संतांच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे; विराट अनुष्काचे नावही आहे भक्तांच्या यादीत

हेराफेरी 3 विषयी..

या सिनेमातून बाबूभैय्याची व्यक्तिरेखा साकारणारे परेश रावल या सिनेमातून काही कारणास्तव बाहेर पडले होते. पण मेकर्सच्यात आणि त्यांच्यात समेट झाला असून आता ते या सिनेमात दिसणार असल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news