

तामीळ अभिनेता आणि कॉमेडियन रोबो शंकर यांचे अलीकडेच चेन्नईमध्ये निधन झाले. ते 46 वर्षांचे होते. सिनेमाच्या सेटवर काम करताना शंकर अचानक बेशुद्ध झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रोबो शंकरच्या निधनाने तामीळ साऊथसृष्टीला धक्का बसला. (Latest Entertainment News)
शंकर यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे कारण मल्टीपल ऑर्गन फेल्युअर असे सांगितले. मृत्यूनंतर शंकर यांचे पार्थिव चेन्नईतील वलसरवक्कम या ठिकाणी ठेवले गेले होते. शंकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रियंका, मुलगी इंद्रजा आणि जावई कार्तिक आहे. पण सध्या रोबो शंकर यांचे अंत्यसंस्कार सध्या सोशल मिडियावर चांगलेच चर्चेत आहेत.
याला कारण आहे ते रोबो शंकरची पत्नी प्रियंका. शंकरच्या अत्यंसंस्कारात प्रियंका बेभान होऊन नाचतानाचा व्हीडियो व्हायरल होतो आहे. पतीच्या अंत्यसंस्कारात प्रियंकाला अशाप्रकारे नाचताना पाहून अनेकांनी सोशल मिडियावर आश्चर्य व्यक्त केले आहे. दुख व्यक्त करण्याची ही कोणती पद्धत आहे असेही अनेकांनी कमेंट केली आहे.
तर अनेकांनी प्रियंकाची पाठराखण केली आहे. त्यांच्या मते तिचे वागणे पूर्णपणे चुकीचे नाहीये. एका कमेंटमध्ये एकाने प्रश्न विचारला आहे की पतीचे निधन झाले असताना ती अशी कशी वागू शकते? यावर एक युजर म्हणते की, ‘तिच्या दु:खाच्या आवेगात ती स्वत:ला विसरून नाचते आहे. तामीळ संस्कृतीचा मान ठेवत ती स्वत:च्या नवऱ्याला अखेरचा निरोप देते आहे.’ तर दुसऱ्या यूजरने सांगितले की अनेक तामीळ समाजात थेपाटम या बिट्सवर नृत्य करणे वेगवेगळ्या भावना दर्शवण्याचे प्रतीक आहे.
अशाप्रकारे आवेगाला वाट करून देण्याचे हे एक माध्यम आहे. समाजात हे फार वेगळे मानले जात नाही. ती कदाचित त्याच्यासोबत स्वतःला नाचताना किंवा त्याच्या अस्तित्वाची आठवण करत असेल, जे तिसऱ्या व्यक्तीला समजणे कठीण असू शकते.’
प्रियंकाने 2020 मध्ये कन्नी मॅडम या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते.