HBD Jaya Prada : या अभिनेत्रीने विवाहित निर्मात्याशी केलं होतं लग्न, पण…

jaya prada
jaya prada
Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन

सौंदर्याने अदाकारी दाखवणाऱ्या जयाप्रदा ( Jaya Prada) दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून नावारुपास आल्या. यानंतर त्‍यांनी सलग ३० वर्ष सिनेमाचा पडदा गाजवला. राजकारणात दहा वर्ष त्या खासदार राहिल्या. पण त्यानंतर मात्र त्या बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून वेगळ्या राहिल्या. आज ३  एप्रिल त्यांचा वाढदिवस होय. आधीपासूनच तीन मुले असलेल्या विवाहित पुरुषाशी त्यांनी ( Jaya Prada) लग्न केले. त्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य चर्चेत राहिले. वैवाहिक आयुष्यात जरी यश मिळाले नसले तरी राजकारणात सुपरहिट ठरणाऱ्या जया प्रदा या एकेकाळी टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.

बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांचा जन्म ३ एप्रिल, १९६२ रोजी आंध्र प्रदेशात झाला. जया यांचे खरे नाव ललिता राणी असे होते. जया यांचे वडील क्रिशना राव तेलुगू चित्रपटाचे फायनान्‍सर होते. जया प्रदा यांनी आपल्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास २०० चित्रपटांमध्ये काम केलं होतं. हिंदी सिनेसृष्टीत त्यांची जितेंद्र आणि अमिताभ यांच्यासोबतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

जया यांनी तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्‍नड, मल्‍याळम, बंगाली आणि मराठीमध्‍ये काम केले आहे. दाक्षिणात्‍य चित्रपटात नाव कमावल्‍यानंतर त्‍या बॉलिवूडकडे वळल्‍या. हिंदी चित्रपटामध्‍ये १९७९ मध्‍ये आलेला 'सरगम'मधून आपली ओळख निर्माण केली. या चित्रपटात त्‍यांनी मूक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.

१० रुपये मानधन

जयाप्रदा यांनी १९७४ मध्‍ये तेलुगू चित्रपट "भूमि कोसम"मधून चित्रपट इंडस्ट्रीमध्‍ये डेब्यू केले होते. त्यांना डेब्यू चित्रपटात संधी मिळण्‍यामागे एक अनोखा किस्सा आहे. जयाप्रदा त्‍यावेळी १३ वर्षांच्या होत्‍या, तिने शाळेच्‍या वार्षिक समारंभात डान्‍स परफॉर्मन्‍स दिला होता. त्‍यावेळी प्रेक्षकांमध्‍ये बसलेल्‍या एका चित्रपट दिग्‍दर्शकाने आपला तेलुगू चित्रपट "भूमि कोसम"मध्‍ये ३ मिनिटांचा डान्‍स नंबर ऑफर केला होता. ही ऑफर मिळाल्‍यानंतर जयाप्रदा निराश होत्‍या. "भूमि कोसम"मध्‍ये काम करण्‍यासाठी जयाप्रदाला मेकर्सनी केवळ १० रुपये मानधन दिले होते.

हिंदी बोलता न आल्‍याने अडचण

'सरगम' हा दाक्षिणात्‍य चित्रपट 'श्री श्री मुआ'चा रीमेक होता. 'श्री श्री मुआ' चित्रपटातही जया यांनी मूक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. परंतु, हिंदी व्‍यवस्‍थित न बोलता आल्‍याने त्यांना बॉलिवूडमध्‍ये करिअर करताना सुरुवातीला बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला होता.

'या' चित्रपटातून हिंदी संवादास सुरुवात

१९८२ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'कामचोर'मध्‍ये जया पहिल्‍यांदा ऑनस्क्रीन फ्लूएंट हिंदी भाषा बोलल्‍या. या चित्रपटामध्‍ये जयासोबत राकेश रोशन मुख्‍य भूमिकेत होते. पुढे अमिताभ बच्चन यांच्‍यासोबत सुपरहिट चित्रपट 'शराबी'मध्‍ये त्‍यांच्‍या भूमिकेचे खूप कौतूक झाले होते. या चित्रपटातील त्‍यांच्‍या डान्‍स बहारदार परफॉर्मन्‍सचे खूप कौतुकही झाले होते.

हा चित्रपट हायएस्ट ग्रॉसर

जया यांनी श्रीदेवी आणि जीतेंद्र स्टारर चित्रपट 'तोहफा'मध्‍ये सुंदर अभिनय केला होता. १९८४ मध्‍ये जया यांचा हा चित्रपट हायएस्ट ग्रॉसिंग मूव्‍ही ठरला होता. याशिवाय, जया यांनी 'गंगा जमुना सरस्वति', 'आज का अर्जुन', 'मां', 'मकसद', 'मवाली' आणि 'औलाद' यासारख्‍या चित्रपटात दमदार अभिनय केला.

राजकारणात पदार्पण

१९९४ नंतर जयाप्रदा राजकारणात उतरल्‍या. सुरुवातीला त्‍यांनी टीडीपी जॉईन केली. नंतर त्‍या समाजवादी पक्षामध्‍ये गेल्‍या. त्‍यांनी दोनवेळा उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्‍या दोनवेळा खासदार झाल्‍या. त्‍यांनी भाजपकडून रामपूरमधूनच मागील लोकसभेची निवडणूक लढवली होती. परंतु, आजमखान यांच्यासमोर त्यांना हार पत्करावी लागली. २००४ ते २०१४ पर्यंत त्या खासदार होत्या.

अलिकडे, टीव्हीवरील मालिका 'परफेक्ट पती'मध्ये दिसल्या होत्या. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवची मुख्य भूमिका होती.

जयाप्रदा यांनी १९८६ रोजी चित्रपट निर्माते श्रीकांत नहाटाशी लग्न केले. परंतु, नहाटा आधीपासूनचं विवाहित होते. नहाटा यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच हे पाऊल उचलले होते. त्यामुळे जया यांचे लग्न वादग्रस्त ठरले होते. श्रीकांतची आधीपासूनचं तीन मुले होती. असं म्हटलं जातं की, श्रीकांत यांना पुन्हा मुल नको होतं. त्यामुळेच जया प्रदा यांना अपत्य झाले नाही. त्यांनी आपल्या बहिणीचा मुलगा सिद्दूला दत्तक घेतलं होतं.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news