

Sanam Teri Kasam 2 rejected due to Mawra Hocane
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सनम तेरी कसम फेम अभिनेता हर्षवर्धन राणेने मोठा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी सनम तेरी कसम २ मध्ये मावरा होकेनला मुख्य अभिनेत्री म्हणून निवडल्यास चित्रपटाच्या सिक्वेलचा भाग होण्यास हर्षवर्धनने नकार दिला आहे. मावराने सनम तेरी कसम चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेत्री मावरा होकेन हिने भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला होता. तिची पोस्ट व्हायरल झाली होती.
२०१६ मध्ये सनम तेरी कसम चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन आणि हर्षवर्धन मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही. त्यावेळी केवळ ९ कोटी रुपये कमावले होते. पण, जेव्हा चित्रपट री-रिलीज झाला तेव्हा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.
मावरा होकेनने इन्स्टाग्रामवर काय लिहिले होते- "पाकिस्तानवरील भारताच्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते. निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.''
हर्षवर्धन राणेने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मावरा होकेनच्या पोस्टवर तीव्र टीका केली. त्याने लिहिलं, “मी अनुभवासाठी आभारी आहे, परंतु जसी परिस्थिती आहे आणि माझ्या देशाबद्दल केलेले पोस्ट वाचल्यानंतर मी ‘सनम तेरी कसम’ पार्ट २ चाभाग होण्यासाठी सन्मानपूर्वक नकार देण्याचा निर्णय घेतला आहे. जर मागील कास्ट पुन्हा या चित्रपटात येण्याची शक्यता असेल तर...”
हर्षवर्धन राणेने दुसऱ्या स्टोरीमध्ये लिहिलं, “मी हा देश, तो देश, केन्या..मंगळ ग्रहावरील सर्व कलाकार आणि माणसांचा सन्मान करतो, परंतु, माझ्या देशाबद्दल कुणीतरी केलेले अपमानजनक विधान अक्षम्य आहे. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स कमी झाल्याने मला कुठलीही समस्या नाही...पण देशाविषयी अपमानजनक, द्वेषाने भरलेली टीका सहन करणार नाही.”