Harsh Chhaya On Divorce: घटस्फोट हा काही मोठा विषय नाही; मी दोन तीन डेटवर गेलोय.. अभिनेता हर्ष छाया काय म्हणाला?

Harsh Chhaya On Divorce
Harsh Chhaya On Divorcepudhari
Published on
Updated on

Harsh Chhaya On Divorce With Shefali Shah: हर्ष छाया हा भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील एक नावाजलेला अभिनेता आहे. तो हसरते आणि लागा चुनरी मैं दाग या मालिकांमधून प्रसिद्ध झाला. त्याने नुकतेच त्याची एक्स वाईफ आणि अभिनेत्री शेफाली शहासोबत झालेल्या घटस्फोटाबाबत बोलला होता. शेफाली आणि हर्ष यांचे लग्न सहा वर्षे टिकलं होत.

Harsh Chhaya On Divorce
Thalapthy Vijay | सुपरस्टारचा मोठेपणा इथेच दिसला! प्रेमाखातर थलपतिची तहान-भूक हरपली; ४५ अंश तापमानात उभा राहिला, श्रिया सरनने सांगितला भावूक प्रसंग

मी त्यासाठी तयार होतो

हर्षने मुलाखतीत सांगितलं की, 'घटस्फोट हे प्रकरण व्यक्तीसापेक्ष असतं ते प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं असतं. आमच्या केसमध्ये स्पष्ट होतं की हे नातं आता शेवटाकडे आलेलं आहे. ज्यावेळी मला सांगण्यात आलं की मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. त्याच्या आधी ८ ते ९ महिने मला माहिती होतं की हे असं काही होणार आहे. मी त्यासाठी तयार होतो.'

Harsh Chhaya On Divorce
Raja Shivaji Vidya Balan |'यालाच म्हणतात नशीब!' 'बडी बेगम'ची भूमिका तब्बूने नाकारली अन् हजारो रिजेक्शन झेलणाऱ्या 'या' अभिनेत्रीचं नशीब फळफळलं!

उगाच कणखर असल्याचं दाखवू नका

हर्ष पुढे म्हणाला, 'माझ्यासाठी जरी हे घडणार आहे हे मला माहिती होतं. तरी मी त्याचा माझ्या मानसिकतेवर परिणाम होऊ दिला नाही. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केलं. कारण मी दिल्ली सोडून मुंबईसाठी यासाठीच आलो होतो. वैयक्तिकरित्या एखादा व्यक्ती अशी परिस्थिती कशी हाताळतो हा ज्याचा त्याचा विषय आहे. सुदैवाने मी अशा भागातून येतो की तुम्ही तिथल्या लोकांना सहजासहजी हलवू शकत नाही.'

घटस्फोटाबाबत बोलताना हर्ष म्हणाला, 'अशा प्रकारची परिस्थिती आल्यावर तुम्ही सामान्य राहणं गरजेचं असतं. जर तुम्ही अस्वस्थ असाल तर त्याच्यासोबत जगा. उगाच तुम्ही कणखर असल्यासारखं दाखवू नका. मी या स्थितीत पाच ते सहा महिने राहिलो आहे. मला पश्चाताप होत होता, मी ओरडत होतो.

Harsh Chhaya On Divorce
Asha Bhosale: आशा भोसले यांना कलाकारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली; संगीतविश्वात शोककळा

मी तो फॉर्म्युलाच बनवला होता

'एके दिवशी मी पाहिलं की तुम्ही तणावात आहात, तुमच्या आजूबाजूचे सर्व तुमची स्टोरी ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. ते त्यांचे मत देत आहे. मी ज्यावेळी एखाद्यासोबत बोलायचो आणि आम्ही आमच्या समस्या बोलायचो नंतर आम्ही डेटवर जायचो. असं काही वेळा झालं मी तो फॉर्म्युलाच बनवला. त्या दोन तीन महिन्यात मी अनेक डेटवर गेलो. याला वेळ लागतो तुम्ही खूप धाडसी आहात असं दाखवण्याची गरज नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या भावना प्रदर्शित करा.' असं देखील हर्षने सांगितलं. हर्षने शेफाली शहासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री सुनिता सेनगुप्तासोबत लग्न केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news