पुढारी ऑनलाईन डेस्क : हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना एका रिपोर्टनुसार, नताशाला पांड्याची ७० टक्के संपत्तीचा हिस्सा मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पांड्या आणि त्याची पत्नी, अभिनेत्री नताशा स्टेनकोविक घटस्फोट घेणार आहेत. परंतु, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अधिक वाचा-
पांड्या आणि नताशा खूप महिन्यांपासून एकत्र दिसले नाहीत. या दोघांना इन्स्टाग्रामवर अखेरीस १४ फेब्रुवारीला फोटो शेअर केला होता. यनंतर एका कार्यक्रमातील व्हिडिओमध्ये दोघे एकत्र दिसले होते. आता घटस्फोटाच्या वृत्ताने जोर पकडला आहे. रिपोर्टनुसार, पांड्याला आपल्या संपत्तीच्या ७० टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागेल. यावरून सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट शेअर करण्यात आले आहेत.
अधिक वाचा-
पांड्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचा हिस्सा आहे. त्याला टीमकडून फी म्हणून १५ कोटी रुपये मिळतात. याआधी तो गुजरात टाइटन्सचा हिस्सा होता. गुजरातची टीमदेखील पांड्याला इतकेच मानधन द्यायची. तसेच भारतीय क्रिकेट टीमकडूनही मॅच फी मिळते. पांड्याची कोटींची कमाई आहे. सोबतचं तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करतो.
अभिनेत्री नताशा स्टेनकोविकने घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पहिली पोस्ट शेअर केली आहे. नताशाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नताशाने अंडर आय मास्क लावलेली दिसत आहे. यावेळी ती वो मिररमध्ये सेल्फी घेताना दिसते. अभिनेत्रीचा हा सेल्फ लव्ह आणि केअर केलेले दोन्ही फोटो पाहून फॅन्सना थोडा दिलासा मिळाला आहे. काही तासानंतर नताशाने आणखी काही फोटो, व्हिडिओ पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये ती जिममध्ये वर्कआऊट करताना दिसतेय.
अधिक वाचा-
हार्दिक पांड्याने मुंबईमध्ये एक अपार्टमेंट घेतलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने ३० कोटींमध्ये हे घर घेतले होते. वडोदरामध्ये एक पेंटहाऊस आहे. त्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.