पुढारी ऑनलाईन डेस्क : 'हिरामंडी' १ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या सीरीजचे सातत्याने चर्चा होत राहते. यामधील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे. तसेच 'हिरामंडी'चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळीची देखील चर्चा होत आहे. या सीरीजमध्ये ऋचा चड्ढाने लज्जो नावाच्या तवायफची भूमिका साकारली होती. ती एका नवाबाच्या प्रेमात पडते. तिने हिरामंडीच्या शूटिंगचा एक किस्सा उघड केला. कपिल शर्माच्या शोमध्ये तिने सांगितलं की, आपल्या एका डान्स नंबरसाठी तिने ९९ टेक घेतले होते. त्यावर भन्साळींनी देखील किस्सा शेअर केला.
अधिक वाचा-
ऋचा चड्ढाने 'हिरामंडी'च्या 'मासूम दिल है मेरा' गाण्यात जबरदस्त परफॉरर्मन्स दिली. पण हे गाणे शूट करताना अभिनेत्री ऋचा व्यवस्थितपणे परफॉर्म करता आले नाही. भन्साळींनी सांगितले की, ऋचाला तिने फटकारले होते. त्यानंतर तिला खूप राग आळा होता. शूट संपता संपता तिला रडू कोसळलं. तर या सीरीजच्या गाण्यात रडताना दिसते. ते तिचे खरे अश्रू आहेत.
अधिक वाचा-
एका वेबसाईटशी बोलताना तिने सांगितले की, 'ऋचाला परफेक्ट परफॉर्म करण्यासाठी वेळ लागतो. तो एक स्पेशल मोमेंट होता. ती प्रयत्न करत होती. एका वेळेनंतर भन्साळी तिला म्हणाले, मी थोडं अस्वस्थ आहे. तू रिहर्सल केली आहेस, तरीदेखील तुझ्य़ाकडून होत नाहीये. मी थोडा संतपालो आणि ती देखील अस्वस्थ होती.'
भन्साळींनी हेदेखील सांगितलं की, ऋचाच्या त्या एक्सप्रेशन्सना मी शॉटमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला. 'तिच्या चेहऱ्यावर खूप राग होता. तोच क्षण आम्ही उचलला आणि सीनमध्ये घातला. मी शूट केलेल्या सर्व मोठ्या गाण्यांमध्ये हे दुर्मिळ क्षण होते. जेव्हा अभिनेत्रीला त्या सीनसाठी अपमान वाटत होता, तेव्हा मी नाराज होतो आणि मी म्हणालो, 'अजून किती टेक हवेत तुला?' नाराजी दोन्हीकडून होती. एखादा कलाकार इतका अपमान पाहून रागाच्या भरात सेटवरून निघून गेला असता. आम्हा दोघांना माहिती होतं की, हा शॉट किती गरजेचा आहे.'
भन्साळींनी सांगितलं की, जेव्हा डान्सचा सीन शूट झाला तेव्हा सर्वांनी तिचे कौतुक करत टाळ्या वाजवल्या. आणि मग झालेल्या चुकांसाठी माफी मागितली. भन्साळी म्हणाले, 'मी गेलो आणि आलिंगन दिलंआम्ही दोघेही विसरलो की, शॉटच्या वेळी काय घडलं होतं. जेव्ही मी पाहत होतो , मी विचार केला की, ती खरंच रडत आहे. तिने प्रत्येक बीट पकडला होता. शेवटपर्यंत आपला राग आणि तणाव तिच्या चेहऱ्यावरून जाऊ दला नाही.'
अधिक वाचा-