

शाहरुख आणि गौरीची प्रेमकहाणी संघर्ष, ब्रेकअप आणि पुन्हा झालेल्या प्रेमाने भरलेली आहे. अनेक अडचणींवर मात करून दोघांनी लग्न केलं आणि आजही एकत्र आहेत. शाहरुखच्या वाढदिवशी त्याची ही ‘फिल्मी पण खरी’ लव्ह स्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मुंबई - बॉलिवूडचा ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणजे शाहरुख खान! पण त्याचं आणि गौरीचं नातं ही केवळ फिल्मी गोष्ट नाही, तर वास्तवातली एक सुंदर प्रेमकहाणी आहे. आज शाहरुख खानचा वाढदिवस असून या निमित्ताने त्याच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायलाच हवं. बॉलिवूडमध्ये शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांचे नाते सर्वश्रुत आहे. दोघेही आपापल्या व्यवसायात तरबेज आहेत. २५ ऑक्टोबर, १९९१ मध्ये दोघांनी विवाह केला होता. पण, त्यांच्या लग्नाआधीच्या नात्यामध्ये एक खास कहाणी आहे. शाहरुख २ नोव्हेंबरला साठीत प्रवेश करतोय. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया, गौरी सोबतचं शाहरूख खानचं लग्नाआधी नातं कसं होतं...
शाहरुखने टीव्हीवर काम करावे पण चित्रपट नाही, असे गौरीला वाटत होतं. तेव्हा शाहरुख-गौरा यांनी लग्न केले नव्हते. गौरीने त्याला चित्रपटात जाण्यापासून मनाई केली होती. कारण, होतं अफेअरची भीती.
शाहरुख खानशी विवाह करण्यापूर्वी गौरी खानचं नाव गौरी छिब्बर होतं. ती आज एक यशस्वी उद्योजिका आहे. ती रेड चिलीज एंटरटेनमेंटची को-ओनर तर आहेच शिवाय तिने इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रात आपला मजबूत ठसा उमटवला आहे. ती केवळ उद्योजिका नाही तर प्रोड्युसर देखील आहे. तिने आपला पहिला चित्रपट 'मैं हूं ना' २००४ मध्ये प्रोड्यूस केला होता.
गौरी खान आणि शाहरूख खान याची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. आधी ब्रेकअप आणि नंतर पुन्हा प्रेम असं काहीसं..परंतु, त्यांच्या आयुष्यात असं एक धोकादायक वळण आलं, ज्यामुळे दोघे दुरावले. दोघांचा ब्रेकअप झाला. शाहरुख खान आणि गौरी एकमेकांवर प्रेम करत होते. आणि अनेक वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी आपल्या प्रेमाबद्दल घरच्या मंडळींना सांगितले होते. पण गौरीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं. परंतु या नात्याचा प्रवास सोपा नव्हता. शाहरुखच्या अतिप्रेमामुळे आणि गौरीच्या कुटुंबातील विरोधामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला.
शाहरुख दिल्लीचा राहणारा होता. दोघांची पहिली भेट १९८४ मध्ये एका कॉमन मित्राच्या पार्टीत झाली होती. त्यावेळी शाहरुख फक्त १८ वर्षांचा होता आणि गौरी १४ वर्षांची. दोघे एका पार्टीत भेटले आणि पहिल्याच नजरेत शाहरुखला गौरी आवडली. पण, गौरी त्याच्याशी फारसं बोलली नाही. शाहरुखने तिला फोन करून भेटण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. मजेशीर म्हणजे शाहरुखच्या लाजाळू स्वभावामुळे गौरीसमोर तो आपलं प्रेम व्यक्त करू शकला नाही.
गौरी ज्या-ज्या पार्टीत जायची, तेथे पहिल्यांदा तो हजर राहायचा. मित्रांच्या मदतीने शाहरुखने गौरीचा फोन नंबर मिळवला. यानंतर दोघेही फोनवरून बोलू लागले. काही दिवसांनी शाहरुख आणि गौरीमध्ये वाद झाले. एका क्षणी गौरीने त्याच्याशी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आणि ती आपल्या मैत्रिणींसोबत मुंबईला गेली.
शाहरुखला दुसर्यांशी बोलणे आणि केस मोकळे ठेवणं फारसं आवडायचं नाही. या गोष्टीला कंटाळून गौरीने शाहरूखशी ब्रेकअप केल्याचं म्हटलं जातं. पण नंतर शाहरुख तिला भेटण्यासाठी पुन्हा मुंबईत गेला. शाहरुखजवळ फारसे पैसेही नव्हते. पैशांची जमवाजमव करून गौरीला शोधण्यासाठीत तो मुंबईत पोहोचला. त्याने गौरीला खूप शोधलं, पण ती सापडली नाही. शेवटी तो मुंबईच्या एका बीचवर जाऊन बसला. त्याचवेळी तेथे त्याला गौरी दिसली. ती आपल्या मैत्रीणींसोबत तेथे आली होते. त्यांनी एकमेकांना पाहिले आणि दोघांनाही अश्रू अनावर झाले. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.