

संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, तो प्रत्यक्षात एका प्रोजेक्टचा सीन असल्याचं स्पष्ट झालं असून चाहत्यांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
Sanjay Mishra Mahima Chaudhry Marriage video viral
मुंबई - बॉलीवूडचे ज्येष्ठ आणि बहुचर्चित अभिनेते संजय मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण म्हणजे त्यांचा आणि अभिनेत्री महिमा चौधरीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघे लग्नाच्या पेहरावात दिसत असल्याने नेटकऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे की, “संजय मिश्रा यांनी खरंच लग्न केलं का?” असा प्रश्न देखील सोशल मीडियावर अनेकांनी विचारला.
या व्हिडिओमध्ये संजय मिश्रा पारंपरिक शेरवानीत तर महिमा चौधरी लाल रंगाच्या साडीत सुंदर नववधूसारखी दिसते. लग्नाची सजावट, फुलांची आरास आणि मंत्रोच्चारांचा आवाज पाहून अनेकांनी हा खरंच विवाहसोहळा समजून घेतला. मात्र, प्रत्यक्षात हा व्हिडिओ त्यांच्या आगामी प्रोजेक्टचा एक भाग असल्याचे समोर आले आहे.
महिमा ५२ वर्षांची आहे तर संजय मिश्रा ६२ वर्षांचे आहेत. वधू वेषात महिमा चौधरी लाल साडीत दिसत असून संजय मिश्रा आणि महिमाने वधू-वरासारखे फोटो पोझ देखील दिले. पापराझींना पाहून महिमा हे देखील म्हणते की, तुम्ही लोक लग्नात येऊ शकला नाही. पण आता मिठाई खायला अवश्य या. महिमा चौधरी आणि संजय मिश्रा यांचा हा व्हिडिओ पाहून फॅन्स म्हणाले, हे नेमकं काय प्रकरण आहे?
नेमकं प्रकरण काय?
खरंतर महिमा चौधरी आणि संजय मिश्रा सोबत एक चित्रपट आणत आहेत. दोघेही कपलच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी हा लूक सर्वांसमोर केला आहे. महिमा आणि संजय मिश्रा यांनी हा लूक आगामी चित्रपट 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' साठी केला आहे. दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी मध्ये महिमा, संजय मिश्रा यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज होईल.
काही दिवसांपूर्वी महिमा चौधरीने सोशल मीडियावर दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले होते. चित्रपटात व्योम आणि पलक ललवानी यांच्याही भूमिका असतील.