Hanuman Ansh Box Office Update: हनुमान अंशची 'हनुमान उडी' 6 आठवड्यात तब्बल १२,०६९ % नफा; मिर्झापूर, हैवानचं काय झालं?

Hanuman Ansh Box Office Update
Hanuman Ansh Box Office Updatepudhari
Published on
Updated on

Hanuman Ansh Box Office Collection Update: नीम करोली बाबा यांच्यावर आधारित भक्ती चित्रपट हनुमान अंशने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवरली हनुमान अंशचा वाढता प्रभाव काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. रिलीजनंतर ४२ व्या दिवशी देखील या चित्रपटाने धडाकेबाज कमाई करणं सुरूच ठेवलं आहे. विशेष म्हणजे हनुमान अंशच्या समोर मिर्झापूर आणि हैवान सारख्या दोन तगड्या फिल्म असताना देखील हनुमान अंशची हनुमान उडी जोरदार सुरू आहे.

Hanuman Ansh Box Office Update
Hanuman Ansh : हनुमान अंशने २०२६ मधील 'या' १६ हिंदी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले, मिर्झापूर द मूव्हीलाही टाकले मागे

तब्बल १२,०६९ टक्के नफा

गुरूवारी डॉक्टर विशाल चतुर्वेदींच्या दिग्दर्शनातील चित्रपटाने आपला सहावा आठवडा पूर्ण केला. हनुमान अशंची ५ व्या आठवड्याच्या तुलनेत ६ व्या आठवड्यातील कमाई ही ११.०८ टक्क्यांनी घटली आहे. मात्र तरीसुद्धा नीम करोली बाबांवरील या चित्रपटाने मिर्झापूर द मुव्ही आणि नुकतीच रिलीज झालेल्या हैवानला घाम फोडला आहे. फक्त २ कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने देशात तब्बल १२,०६९ टक्क्यांचा नफा कमावला आहे. तर वर्ल्डवाईड या चित्रपटाने ३०९ कोटींचा गल्ला कमवला आहे.

Hanuman Ansh Box Office Update
Hanuman Ansh : धुरंधर, एनिमल, छावा, दंगल, पठाण... सगळे चारही मुंड्या चीत! ‘हनुमान अंश’ने अशी दिली धोबीपछाड

नवीन रिलीजचाही परिणाम नाही

शुक्रवारी १८ सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर अजून दोन नवीन चित्रपट रिलीज झाले आहेत. करीना कपूर स्टारर दायरा आणि कुणाल खेमूचा वाईब हे दोन चित्रपट रिलीज झाला आहेत. मात्र हनुमान अंश ज्या प्रकारे कल्ट ब्लॉकबास्टर ठरली आहे ते पाहता या दोन चित्रपटांचा त्यावर कोणता प्रभाव पडले असं वाटत नाही.

मिर्झापूर सारखी स्टारकास्टने दणकट आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या चित्रपटाला देखील दुसऱ्या आठवड्यात फक्त ५४.७५ कोटी नेट बिजनेस करता आला आहे. फ्लॉप ठरलेला हैवान या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात फक्त ९.८५ कोटी रूपये कमवले आहेत.

Hanuman Ansh Box Office Update
Hanuman Ansh Controversy: 'हनुमान अंश' चित्रपटावरुन मुंबईत राडा; पोलिसांनी थेट थिएटरलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?

हनुमान अंशची कमाई

Sacnilk ने दिलेल्या माहितीनुसार शोभिनव सत्यची प्रमुख भूमिका असलेल्या हनुमान अंशने गुरूवारी ४२ व्या दिवशी देशातील ९१६० शोजमधून ६.२५ कोटी रूपये नेट कमाई केली. याबरोबरच भारतात या चित्रपटाने एकूण २८७.४० कोटींची तर एकूण नेट कलेक्शन २४३.३८ कोटी झाली आहे.

हा भक्ती चित्रपट ज्या वेगाने कमाई करत आहे ते पाहता शुक्रवारी किंवा शनिवारी देशांतर्गत कमाईत २५० कोटींचा टप्पा पार करेल. जर दायरा आणि वाईबचा या चित्रपटाच्या कलेक्शनवर काही परिणाम झाला नाही तर हा चित्रपट ३०० कोटींच्या पार गेला तर आश्चर्य वाटायला नको.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news