Actress Hansika Motwani Divorce: ४ वर्षांचा संसार मोडला! हंसिका मोटवानी, पती सोहेल कथुरियाकडे किती मागितली पोटगी?

Actress Hansika Motwani Divorce: ४ वर्षांचा संसार मोडला! हंसिका मोटवानी, पती सोहेल कथुरियाकडे किती मागितली पोटगी?
Actress Hansika Motwani
Actress Hansika Motwani Divorceinstagram
Published on
Updated on
Summary

अभिनेत्री Hansika Motwani आणि तिचे पती Sohael Kathuria यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत सध्या चर्चांना उधाण आले आहे. लग्नानंतर चार वर्षांनी दोघे वेगळे होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चर्चांदरम्यान पोटगीबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Hansika Motwani-Sohael Khaturiya granted Divorce

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या आणि तिचे पती सोहेल कथुरिया यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. लग्नानंतर जवळपास चार वर्षांनी दोघे वेगळे होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया यांनी काही वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. फॅन्सनीही या जोडीला मोठा प्रतिसाद दिला होता. मात्र आता त्यांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून, हंसिका मोटवानी तिचा पती सोहेलपासून वेगळी राहत असल्याचे वृत्त समोर आले होते. पण, दोघांचे नाते संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि उद्योगपती सोहेल कथुरिया यांनी परस्पर संमतीने त्यांचे लग्न संपवले आहे. मुंबईतील एका कौटुंबिक न्यायालयाने त्यांना परस्पर घटस्फोट मंजूर केल्याचे वृत्त आहे.

Actress Hansika Motwani
Not love jihad : Mahakumbh girl Monalisa | ट्रोल झाल्यानंतर मोनालिसा स्पष्टच म्हणाली, 'लव्ह जिहाद नाही; प्रत्येक धर्माचा आदर..'

रिपोर्टनुसार, दोघांमध्ये काही काळापासून वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याच कारणामुळे ते वेगळे राहण्याचा विचार करत असल्याचेही काही ठिकाणी म्हटले जात आहे. मात्र या सर्व चर्चांबाबत हंसिका किंवा सोहेल यांनी अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. २०२४ पासून दोघे वेगळे राहत होते.

Actress Hansika Motwani
Dhurandhar The Revenge Song AARI AARI | खतरनाक लूकमधून रणवीर, आदित्य धर यांच्या बर्थडेला फॅन्ससाठी मोठं गिफ्ट

सूत्रांनुसार, घटस्फोटाची प्रक्रिया सौहार्दपूर्णपणे पूर्ण झाली आणि दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे, हंसिका मोटवानीने पोटगीची मागणी केली नाही. तिने कोणत्याही आर्थिक दाव्याशिवाय घटस्फोटाला सहमती दर्शविली. कोणताही वाद समोर न आणता कायदेशीर घटस्फोटासाठी दोघांनीही सहमती दर्शवली.

हंसिका आणि सोहेलचे लग्न डिसेंबर २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात झाले होते. राजस्थानमधील जयपूर येथे रॉयल वेडिंग ठरले होते. हंसिका मोटवानी ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर सोहेल कथुरिया एक व्यावसायिक म्हणून ओळखला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news