गुरमीत चौधरीच्या ‘महाराणा’ वेब सीरीजचे शूटिंग बंद, नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर मोठा निर्णय

Gurmeet Choudhary
Gurmeet Choudhary

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित हॉटस्टारवरील सीरीज 'महाराणा' चे शूटिंग थांबवण्यात आलं आहे. यामध्ये अभिनेता गुरमीत चौधरी मुख्य भूमिकेत होता. टीजर रिलीज झाल्यानंतर सीरीजचे शूटिंग थांबवण्यात आलं आहे. आता सीरीज रिलीज होणार नाही. दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अचानक मृत्यूने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी हॉटस्टारने वेब सीरीज 'महाराणा' ची घोषणा केली होती. यामध्ये गुरमीत चौधरी यांना महाराणा प्रताप यांच्या भूमिकेसाठी आणि अभिनेत्री रिद्धिमा पंडितला महाराणी अजबदे पुनवारच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले होते. या सीरीजचे अर्धे शूटिंग आधीच झाले होते.

अधिक वाचा –

सूत्रांच्या माहितीनुसार, 'नितीन देसाई यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. जवळपास एक वर्षाच्या तयारीनंतर मागील वर्षी त्यांनी सीरीजची शूटिंग सुरु केले होते. सुरुवातीला टीमने गुरमीत चौधरीसोबत शूटिंग सुरू केली होती. प्रोजेक्ट सुरू होण्याच्या जवळपास ६ महिन्यांनंतर नितीन यांचे निधन झाले. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या टीमकडे हा प्रोजेक्ट बंद करण्याशिवा, दुसरा पर्याय नव्हता.'

अधिक वाचा –

'महाराणा' टीजर

शोचा पहिला टीजर काही महिन्यांपूर्वीही समोर आला होता. ज्यामध्ये योद्धा राजावर चित्रीत करण्यात आलेले सीन्स होते.

अधिक वाचा –

गुरमीत चौधरी काय म्हणाला?

'महाराणा' सीरीजविषयी बोलताना गुरमीतने सांगितले होते, 'अशा प्रोजेक्टवर काम करणे सन्मानाची गोष्ट आहे. भारताच्या मातीशी संबंधित आहे. महाराणा प्रताप धाडस आणि वीरतेसाठी ओळखले जातात. त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेतलं, यासाठीमी खूप खुश आहे. स्वत: महाराणा प्रताप यांच्यासारखे सशक्त चरित्र दाखवणे एक आव्हानात्मक आहे.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news