GTA 6 Earnings: रचला इतिहास! GTA 6ने पहिल्या दिवशी किती कोटी कमावले? Spider-Man, Avengers आणि The Odyssey सारखे चित्रपटही पडले मागे

GTA 6 Earns 35,126 Crore on Day One: Rockstar Games च्या GTA 6 या बहुप्रतीक्षित गेमने पहिल्याच दिवशी तब्बल 35,126 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
GTA 6 Earnings
GTA 6 EarningsPudhari
Published on: 
Updated on: 

GTA 6 Earns 35,126 Crore on Day One: व्हिडिओ गेमच्या जगात Grand Theft Auto (GTA) या गेमची लोकप्रियता वाढत आहे. Rockstar Gamesच्या बहुप्रतीक्षित GTA 6 या गेमने कमाईचे नवे विक्रम केले आहेत. प्री-ऑर्डर आणि लॉन्चच्या पहिल्याच दिवसातील विक्रीतून या गेमने तब्बल 3.79 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 35,126 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. त्यामुळे गेमिंग विश्वात या लॉन्चची जोरदार चर्चा सुरू आहे.

ANI च्या वृत्तानुसार, GTA 6 ची मूळ कंपनी Take-Two Interactive ने या लॉन्चला मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठे लॉन्च असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, कोणत्याही माध्यमातील मनोरंजन उत्पादनाच्या लॉन्चने आतापर्यंत एवढी मोठी कमाई केलेली नाही. मात्र, पहिल्या दिवशी गेमच्या नेमक्या किती प्रती विकल्या गेल्या, याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही.

मोठ्या हॉलीवूड चित्रपटांनाही टाकले मागे

GTA 6 च्या कमाईची तुलना आता हॉलीवूडमधील मोठ्या चित्रपटांशी केली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी Spider-Man: Brand New Day ने जगभरात 2.52 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला आहे. तर ख्रिस्तोफर नोलन यांच्या The Odyssey या चित्रपटाने 1.8 अब्ज डॉलरपेक्षा अधिक कमाई केली आहे.

एवढेच नाही, तर Avengers: Endgame या सुपरहिट चित्रपटाच्या 2.9 अब्ज डॉलरच्या कमाईलाही GTA 6 ने मागे टाकले आहे. जेम्स कॅमेरून यांच्या Avatar मालिकेतील मागील दोन चित्रपटांच्या एकत्रित कमाईशीही GTA 6 ची तुलना केली जात आहे.

GTA 6 Earnings
Ramayana Box Office Day 15: एकामागून एक विक्रम मोडले; ‘रामायण’ने बॉक्स ऑफिसवर रचला कमाईचा नवा इतिहास, किती कोटी कमावले?

गेम बनवण्यासाठी खर्च केले 1.5 अब्ज डॉलर

GTA 6 हा गेम तयार करण्यासाठी Rockstar Games ला 10 वर्षांहून अधिक काळ लागला आहे. या गेमच्या निर्मितीसाठी जवळपास 1.5 अब्ज डॉलर खर्च करण्यात आल्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा गेम आतापर्यंतच्या सर्वाधिक खर्चिक व्हिडिओ गेम्सपैकी एक आहे.

हा गेम PlayStation 5 आणि Xbox Series X तसेच Series S या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. Xbox च्या Cloud Gamingद्वारे Xbox One वरही तो खेळता येतो.

या गेमच्या दोन आवृत्त्या आहेत. त्यांच्या किमतीत 20 डॉलरचा फरक आहे.

  • Standard Edition: 80 डॉलर

  • Ultimate Edition: 100 डॉलर

गेमसाठी 25 जूनपासून प्री-ऑर्डर सुरू करण्यात आल्या होत्या.

80 तासांची स्टोरी; जेसन आणि लुसिया मुख्य भूमिकेत

GTA 6 ची कथा Leonida या काल्पनिक ठिकाणी घडते. या गेममध्ये जेसन आणि लुसिया ही दोन प्रमुख पात्रे आहेत. गुन्हेगारी विश्वात अडकलेल्या या दोघांची स्टोरी गेममध्ये पाहायला मिळते. या गेमची मुख्य स्टोरी पूर्ण करण्यासाठी जवळपास 80 तास लागतात. त्यामुळे गेम खेळणाऱ्यांना अनेक मिशन्स आणि वेगवेगळे अनुभव घेता येणार आहेत.

GTA 6 Earnings
Dadasaheb Phalke Awards 2026: समय रैना, स्मृती इराणी, आदित्य धर... दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा; कोणाला कोणता पुरस्कार मिळाला?

Game of the Year पुरस्कारासाठीही नामांकन

GTA 6 ला Metacritic वर 99 गुण मिळाले आहेत. या गुणांमुळे हा गेम आतापर्यंतच्या सर्वाधिक रेटिंग मिळवणाऱ्या व्हिडिओ गेम्समध्ये सामील झाला आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या The Game Awards मध्येही या गेमला 'Game of the Year' या महत्त्वाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

दरम्यान, गेमच्या लॉन्चला जगभरातील खेळाडूंकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल Rockstar Games चे संस्थापक सॅम हाउसर यांनी आनंद व्यक्त केला. जगभरातील खेळाडूंनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले असून, हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत साजरा करण्यासाठी कंपनी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.