पुढारी ऑनलाईन डेस्क : अॅबडन्स इन मिलेट्स हे गाणे ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 च्या सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकित झाले आहे. हे तेच गाणे आहे जे पीएम मोदी यांनी फालू आणि त्यांचे पती गौरव शाह यांच्यासोबत लिखित स्वरूपात केले होते. शुक्रवारी (दि.११) आलेल्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 च्या यादीत 'अॅबडन्स इन मिलेट्स'चेही नाव आहे. पंतप्रधान मोदींनी हे गाणे फाल्गुनी शाह आणि गौरव शाह या गायकांना सोबत घेऊन लिहिले आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी नामांकनात एखाद्या राजकारण्याला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Grammy Awards 2024)
पीएम मोदींच्या सूचनेनुसार, 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष' म्हणून साजरे केले जात आहे. भरड धान्याला देशाच्या आहाराचा मुख्य भाग बनवण्यासाठी पंतप्रधान मोदी सातत्याने भर देत आहेत. या क्रमाने, पीएम मोदी यांनी ग्रॅमी पुरस्कार विजेती फाल्गुनी शाह आणि तिचे पती गौरव शाह यांच्यासोबत बाजरीच्या फायद्यांची जगाला ओळख करून देण्यासाठी एक गाणे लिहिले होते. अॅबडन्स इन मिलेट्स या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्सच्या सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. (Grammy Awards 2024)
अॅबडन्स इन मिलेट्स हे गाणे १६ जून रोजी रिलीज झाले. हे गाणे रिलीज होण्यापूर्वी फाल्गुनी शाहने स्वतः सांगितले की, हे गाणे मी आणि माझे पती गौरव शाह आणि पीएम मोदी यांनी एकत्र येत लिहिले आहे. हे गाणे आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष साजरे करण्यासाठी तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये पीएम मोदी देखील दिसत आहेत. फालूच्या म्हणण्यानुसार, हे गाणे पौष्टिक धान्यांचे महत्त्व सांगण्यासाठी आणि जागरुकता वाढवण्यासाठी रचण्यात आले होते. (Grammy Awards 2024)