

कॉमेडी ड्रामा 'ग्राम चिकित्सालय'चा दुसरा सीझन सध्या चर्चेत आहे. दिग्दर्शन ललितम तिवारी यांनी केले असून, लेखन दीपक कुमार मिश्रा, अरुणभ कुमार, वैभव सुमन आणि श्रेया श्रीवास्तव यांनी केले आहे. भटकंडीच्या कुप्रसिद्ध प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लढत असताना, डॉ. प्रभात यांच्या लक्षात येते की, अशा काही समस्या आहेत, ज्यावर वेगळ्या प्रकारच्या उपचारांची गरज आहे. पण त्यांच्या संशोधनाचा खर्चही मोठा आहे.
प्राईम व्हिडिओच्या या सीरीजमध्ये अमोल पराशर, आकाश मखिजा, आनंदेश्वर द्विवेदी, विनय पाठक, आकांक्षा रंजन कपूर आणि गरिमा विक्रांत सिंग हे पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार असून, दिनेश लाल यादव देखील या मालिकेत दिसणार आहेत.
भठकंडी येथील संघर्षरत प्राथमिक आरोग्य केंद्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी डॉ. प्रभात (अमोल पराशर) करत असलेली मोहीम दाखवण्यात यईल. जेव्हा त्यांना वाटते की त्यांनी अखेर गावकऱ्यांची मने जिंकली आहेत, तेव्हाच त्यांच्यासमोर नवीन आव्हाने उभी राहतात. 'आदर्श पीएचसी' हा प्रतिष्ठित किताब मिळवणे ही त्यांच्या समस्या सोडवण्याची गुरुकिल्ली आहे आणि हे लक्षात आल्यानंतर डॉ. प्रभात यांच्या लवकरच लक्षात येते की, वैद्यकीय कौशल्ये आणि सुव्यवस्थित आरोग्य केंद्रापेक्षा प्रसिद्धी अधिक महत्त्वाची आहे. विचित्र गावकरी, स्थानिक राजकारण, शंका आणि कधीही न संपणाऱ्या समस्यांमुळे डॉ. प्रभात यांना भठकंडीच्या समस्येवर काय तोडगा काढणार, हे ग्राम चिकित्सालय पाहिल्यानंतर कळेल.
मालिकेचा नवीन भाग, ज्यात माझ्या पात्राचा भठकंडीमधील मुक्काम आहे, एक अनपेक्षित वळण घेतो. ‘या’ पात्राने काही चांगल्या गोष्टी अनुभवल्या आहेत, पण त्यामुळे त्याच्यासमोर एक नवीनच आव्हान उभे राहते. मला या मालिकेबद्दल आवडलेली गोष्ट म्हणजे, ती ग्रामीण आरोग्यसेवेतील काही अत्यंत वास्तविक आणि आपल्याशी मिळत्याजुळत्या समस्यांवर प्रकाश टाकते. आणि ज्याप्रकारे या समस्या विनोद, आपुलकी आणि भावनांच्या माध्यमातून हाताळल्या जातात, ते सर्व वयोगटातील आणि राज्यभरातील प्रेक्षकांना आकर्षित करते. ही कथा एक दिलगिरी व्यक्त करणारी ठरेल.
- अमोल पराशर, अभिनेता
डॉ. गार्गीची भूमिका साकारणारी आकांक्षा रंजन कपूर म्हणाली, "हा नवीन सीझन ग्रामीण आरोग्यसेवा, ग्रामीण राजकारण आणि लोकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन आव्हानांवर एक नवीन दृष्टिकोन देतो. माझे व्यक्तिमत्व शांत, पण महत्त्वाकांक्षी आहे. माझ्या पात्राबद्दल मला आवडणारी गोष्ट म्हणजे ती धाडसी आहे आणि आपले मत मांडायला घाबरत नाही.''
भोजपुरी स्टार खेसारी लाल आणि निरहुआ देखील सीरीजमध्ये दिसतील. 'पंचायत'चे अशोक पाठक आणि दुर्गेश देखील दिसणार आहे. ही सीरीज २३ जूनला रिलीज होणार आहे.