पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खानसोबत लगान हा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी आणि संजय दत्त सोबत सुपरहिट मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट देणारी अभिनेत्री ग्रेसी सिंहचा आज २० जुलैला वाढदिवस आहे. हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, करिअरची सुरुवात तर धमाकेदार आहेच. पण नंतर त्या तितक्या प्रकाशझोतात आल्या नाहीत जितक्या पहलिया चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. किंवा काही चित्रपट केल्यानंतर त्या अभिनेत्री लाईमलाईटमध्ये आल्या नाहीत. त्या अभिनेत्रींपैकीच एक आहे- ग्रेसी सिंह. (Gracy Singh)
एका मुलाखतीत ग्रेसीने म्हटलं होतं की, 'मी काम तर करू शकते, पण..इंडस्ट्रीत खूप गटबाजी आहे, जी मला समजत नाही. माझ्याकडे काम येणं कधी बंद झाले ते मलाही कळले नाही.'
आमिर खान-संजय दत्त यांच्यासोबत हिट चित्रपट दिल्यानंतर ग्रेसी सिंह लाईमलाईटमध्ये फारशी नव्हती. तिने १९९९ मध्ये ‘हु तू तू’ तून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्याआधी ती टीव्ही मालिका ‘अमानत’ मध्ये दिसली होती. ग्रेसी सिंहला खरी ओळख मिळाली ती लगान या २००१ मध्ये आलेल्या चित्रपटातून. यामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत होता. आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आणि ऑस्करसाठी देखील नॉमिनेशन मिळाले होते.
‘लगान’ नंतर ग्रेसी सिंह सिंघम अजय देवगन सोबत ‘गंगाजल’ आणि संजय दत्त सोबत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये दिसली होती. असे म्हटले जाते की, त्यानंतर तिला काम मिळाले नाही आणि ती चित्रपट इंडस्ट्रीपासून दूर गेली.
नंतर ग्रेसी सिंहने पुन्हा टीव्हीवर वापसी केली. तिने ‘संतोषी मां’ नावाच्या मालिकेतही काम केलं. या शोतून तिला एक वेगळी ओळख मिळाली आणि लोक तिला आजदेखील संतोषी मां या भूमिकेमुळे अधिक ओळखतात. नंतर तिला अन्य कोणत्या प्रोजेक्टमधून पाहण्यात आले नाही. सध्या ती सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह राहते. इन्स्टाग्रामवर ग्रेसी सिंह आपले फोटोज-व्हिडिओ शेअर करते.