Bigg Boss OTT 3| 'अरमान तू राहा कृतिकासोबत, मी मुलांचा सांभाळ करेन!' पायल मलिक घेणार घटस्फोट?

'अरमानला कृतिकासोबत राहायचं तर राहू दे!' पायल मलिक घटस्फोट घेणार?
Payal Malik will divorce to Armaan Malik
पायल मलिक अरमान मलिकला घटस्फोट देणार असल्याचे म्हटले जात आहेPayal Malik Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाई डेस्क : ‘बिग बॉस ओटीटी’ सीजन ३ रा वाद्रस्त होत चालला आहे. अरमान मलिकने विशालला थप्पड लगावली. आता लेटेस्ट एपिसोडमध्ये अदनान शेख- लवकेश कटारिया यांच्यात जोरदार भांडण झालं, ते हाणामारीपर्यंत पोहोचलं. या दरम्यान, सोशल मीडियावर अरमान - कृतिकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे ते खूप ट्रोल होत आहेत. आता पायल मलिकने सांगितलं आहे की, ती अरमानला घटस्फोट देणार आहे.

Payal Malik will divorce to Armaan Malik
Bad Newz | तृप्ती डिमरी-विकी कौशलच्या चित्रपटाची सर्वात मोठी ओपनिंग, ८ कोटींचा गल्ला

बिग बॉस ओटीटी ३ मधून बाहेर झालेली पायल मलिकने घोषणा केली की, तिला अरमानशी वेगळं व्हायचं आहे. अरमान अद्यापही त्याची दुसरी पत्नी कृतिका सोबत शोमध्ये आहे. पण, पायलला तिच्या लग्नाबद्दल द्वेष आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता या द्वेषाचा परिणाम तिच्या मुलांवर पडू लागला आहे. आता ती सहन करू शकत नाही.

Payal Malik will divorce to Armaan Malik
Dada Satram Rohra Dies : 'जय संतोषी मां' चित्रपटाचे निर्माते दादा सतराम रोहरा काळाच्या पडद्याआड

पायलने आपल्या व्लॉगमध्ये म्हटलं की, "मी या ड्रामा आणि द्वेषामुळे खूप कंटाळले आहे. जोपर्यंत हे माझ्यापर्यंत होतं, ठिक होतं. पण आता गोष्ट माझ्या मुलांची आहे. हे खूपचं घृणास्पद आहे. मी या कारणानेच अरमानशी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ते कृतिकासोबत राहू शकतो. मी मुलांचा सांभाळ करेन."

Payal Malik will divorce to Armaan Malik
Bad Newz| विक्की कौशल-तृप्ती डिमरीचा चित्रपट ‘बॅड न्यूज’ रिलीज होताच ऑनलाईन लीक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news