Goodbye 2023 : काय म्हणताहेत सरत्या वर्षाबद्दल मराठी कलाकार?

मराठी कलाकार
मराठी कलाकार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मावळत्या वर्षाला निरोप देताना मराठी कलाकारांनी आपल्या आठवणी सांगितल्या. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मधील अधिपती म्हणजेच ऋषिकेश शेलार ने २०२३ ला निरोप देताना सांगितले, २०२३ ने मला बेस्ट भेट दिली माझ्या मुलीच्या रूपात, १२ जानेवारी माझ्या घरी लक्ष्मीच्या आली. त्याचसोबत पहिल्यांदा मला हिरोची भूमिका साकारायची संधी मिळाली. (Goodbye 2023) २०२३ ने मला हे शिकवलं की जर आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली आणि त्याच्यावर ठाम विश्वास ठेवला तर ते नक्कीच सत्यात उतरतं. २०२३ तुझे आभार मानतो. येणारे वर्षसुद्धा असंच असू दे अशी आशा आहे. (Goodbye 2023)

संबंधित बातम्या –

'तुला शिवकीनं चांगलाच धडा' मधील अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे म्हणाली, २०२३ची माझी आवडती आठवण तेव्हाची आहे. जेव्हा माझी मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' सुरु झाली. अक्षराची भूमिका एका शिक्षिकेची आहे आणि योगायोग असा की माझी आई शिक्षिका होती म्हणून हे पात्र माझ्या खूप जवळचं आहे. या मालिकेची टीम इतकी मजेशीर आहे की, काम करता करता खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला ही मिळतात.

दक्षता जोईल म्हणजेच 'सारं काही तिच्यासाठीची' निशी म्हणाली, खूप छान छान आठवणी तू मला दिल्या. २०२३ मध्ये मी आई-बाबांच्या आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादाने अनपेक्षित गोष्टी घडल्या. माझ्याकडून ज्या चुका झाल्या आहेत, ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत, त्या करायला २०२३ नी एक ऊर्जा दिली. २०२३ मध्ये खूप चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली, मला एक भव्य संधी मिळाली. मला झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात अवॉर्ड मिळाला. २०२३ कडून मी हे शिकले की प्रत्येक दिवस सारखा नसतो पण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही तुमचा दिवस घडवू शकता.

सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली रुपाली म्हणजेच ऐश्वर्या नारकर, २०२३ मधली माझी आवडती आठवण म्हणजे एका बोक्याला पुष्कळ दुखापत झाली होती आणि मी त्याला दवाखान्यात नेऊन त्याचा जीव वाचवला. त्याला झालेली इजा इतकी गंभीर होती की त्याच वाचणं मुश्किल होतं. पण वेळेत उपचार मिळाला म्हणून तो ठणठणीत झाला. मग मी त्याला त्याच्या घराच्या इथे पोहोचवून आले. मला असा वाटतं मुक्या जनावरांना आपल्या साथीची गरज आहे आणि त्यांची मदत करून माझं मन प्रसन्न होतं.

तितिक्षा तावडे म्हणजेच सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली नेत्रा म्हणाली- २०२३ मधली बेस्ट आठवण म्हणजे माझा वाढदिवस खूप छान साजरा झाला. आई, बाबा, माझी बहीण, भाऊजी, भाचा आणि माझ्या काही महत्वाच्या माणसांनी माझा दिवस संस्मरणीय बनवला. २०२३ ने मला संयम ठेवायला शिकवले. २०२२ मध्ये ज्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या, त्या मला २०२३ नी दिल्या आणि तिच खूप मोठी शिकवण होती. २०२३ ने मला शिकवले की थोडा संयम ठेवलास तर जे हवं ते तुझ्या पर्यंत येणार.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news