Dhurandhar Box Office Collection: ‘धुरंधर’ची सर्वाधिक कमाईकडे वाटचाल, Highest-grosser चित्रपटांना टाकणार मागे?

Dhurandhar box office collection- धुरंधरची रेकॉर्डतोड कमाई; highest-grosser चित्रपटांना मागे टाकायला सज्ज
Dhurandhar Box Office Collection: ‘धुरंधर’ची सर्वाधिक कमाईकडे वाटचाल, Highest-grosser चित्रपटांना टाकणार मागे?
Published on
Updated on
Summary

बॉलिवूडमध्ये सध्या ‘धुरंधर’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा मोठी कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. दमदार कथानक, प्रभावी अभिनय आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे ‘धुरंधर’ हा चित्रपट highest-grosser चित्रपटांच्या यादीत वेगाने वर चढताना दिसत आहे.

धुरंधरची बॉक्स ऑफिसवर कमाईची घोडदौड सुरूच आहे. आदित्य धर दिग्दर्शित चित्रपटाची जोरदार चर्चा तर आहेच. सिवाय रोजची कोट्यवधींची कमाई ही चित्रपटाला आणखी खास बनवत आहे. आता विकेंडचा फायदा या चित्रपटाला होणार आहे. जर कमाईची गती कायम राहिली तर यावर्षातील हाएस्ट कमाई केलेल्या चित्रपटाला मागे टाकेल. यामध्ये हृतिक रोशन स्टारर 'वॉर २'च्या कमाईला हा चित्रपट मागे टाकेल, असे म्हटले जात आहे.

पहिल्याच आठवड्यात चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता, तो ‘ब्लॉकबस्टर’ ठरणार हे जवळपास निश्चित झाले होते. ‘धुरंधर’ने पहिल्या काही दिवसांतच कोट्यवधींची कमाई करत अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. ट्रेड ॲनालिस्टच्या मते, सध्याचा कमाईचा वेग कायम राहिला तर ‘धुरंधर’ हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो. आधीच्या highest-grosser चित्रपटांचे रेकॉर्ड मोडण्याच्या अगदी जवळ तो पोहोचला आहे.

एका आठवड्यात चित्रपटाने २०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. आता दिग्दर्शक आपला पहिला चित्रपट 'उरी' (२४४ कोटी रुपये) चा आकडा तोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. रणवीर सिंहच्या या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर अक्षय खन्नाच्या अभिनयाने अनेक बड्या अभिनेत्यांना मागे टाकले आहे. मुख्य अभिनेत्यापेक्षा खलनायकाचीच जोरदार चर्चा होताना दिसलीय.

Dhurandhar Box Office Collection: ‘धुरंधर’ची सर्वाधिक कमाईकडे वाटचाल, Highest-grosser चित्रपटांना टाकणार मागे?
Zubeen Garg Death Case | '३५०० पानांचे चार्जशीट...' जुबिन गर्ग प्रकरणात SIT ची मोठी कारवाई, ७ जण अटकेत

'धुरंधर' हा संजय दत्तच्या करिअरचा दुसरा मोठा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिला चित्रपट 'केजीएफ चॅप्टर २' (४३५ कोटी रुपये), शाहरुख खानसोबत 'रा.वन' (११६ कोटी रुपये), 'ओम शांति ओम' (७८ कोटी रुपये) मध्ये खलनायकाच्या भूमिकेत तसेच अर्जुन रामपालच्या कोणत्याही चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटी रुपयांचे कलेक्शन केलं नाही. पण अक्षय खन्नाचा हा दुसरा चित्रपट आहे. पहिला विक्की कौशलचा 'छावा' सर्व रेकॉर्ड तोडले होते. आणि ६०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.

Dhurandhar Box Office Collection: ‘धुरंधर’ची सर्वाधिक कमाईकडे वाटचाल, Highest-grosser चित्रपटांना टाकणार मागे?
Rajinikanth 75th B'day |'निरोगी दीर्घायुष्य लाभो!' पीएम मोदी ते स्टॅलिन, धनुष ते खुशबू सुंदरने रजनीकांत यांना अशा दिल्या शुभेच्छा

'धुरंधर'ची आठव्या दिवशीची कमाई

'धुरंधर'चे आठव्या दिवसाटे बॉक्स ऑफिस कलेक्शन दमदार ठरले आहे. रिपोर्टनुसार, 'धुरंधर'ने आतापर्यंत २३९.५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. शुक्रवारी, ३२ कोटींचे कलेक्शन केले आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news