Rasika Sunil : चाहते म्हणाले, अजून मालदिवचे फोटो संपले की नाहीत…

Rasika Sunil : चाहते म्हणाले, अजून मालदिवचे फोटो संपले की नाहीत…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया अर्थातचं रसिका सुनील ( Rasika Sunil) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हॉट फोटो शेअर केले आहेत. सध्या रसिकाने पुन्हा एकादा नववर्षाचे स्वागत करताना मालदीवच्या बीचवरील आणि पती आणि बॉयफ्रेड आदित्य बिलागीसोबतचे काही हटके फोटो शेअर केलं आहेत.

रसिका सुनील ( Rasika Sunil) नुकतेच काही दिवसापुर्वी तिचा बॉयफ्रेड आदित्य बिलागीसोबत लग्न बंधनात अडकली. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून दिली होती. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने '१८ ऑक्टोबर २०२१, बीचवर रस्की-आदिचं लग्न', असं कॅप्शन लिहिले होते. दोघाचं लग्न गोव्यात मोजक्याच कुटूंबियासोबत पार पडले.

यानंतर रसिका आणि आदित्य दोघेजण सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदिवला पोहोचले. याच दरम्यान रसिकाने मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावरील हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या रसिकाने आपल्या इंन्स्टाग्राम अकांऊटवर मालदीवच्या बीचवरील एक फोटो शेअर करत नववर्षाचे स्वागत केलं आहे.

हा फोटो शेअर करत तिने येणाऱ्या २०२२ हे नववर्ष पतीसोबत खूपच चांगले असल्याचे सांगितले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने कानिफुशी हॉटेल आणि रिसॉर्ट मालदीव असे लिहिले आहे. याशिवाय तिने बिलागीसोबत शेअर केलेल्या फोटोला २०२१ हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष बनवल्याबद्दल धन्यवाद! ♥️, नवीन वर्षाच्या आणि आमच्या भविष्याच्या शुभेच्छा!! अशी कॅप्शन लिहिली आहे.

मालदिवमधील शेअर केलेल्या फोटोत रसिका समुद्राच्या पाण्यात आणि झोपाळ्यावर बसलेली दिसत आहे. यावेळी तिने कलरफूल एक बिकिनी परिधान केली आहे. या फोटोंनी तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. हा तिचा थ्रोबॅक फोटो आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी वेगवेगळ्या कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'Happy New Year', 'सुंदर' तर आणखी एकाने 'अगं अजून मालदिवचे फोटो संपले की नाहीत ' असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. यावरून असे दिसते की, काही चाहत्यांना रसिकांच्या फोटोला पसंती मिळाली आहे. तर काही जणांनी तिच्या फोटोला नापंसती दर्शविली आहे.

रसिका नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हॉट फोटो शेअर करत चाहत्याच्या संपर्कात राहत असते. याआधी ही तिचे लग्नातील आणि पांढऱ्या रंगाच्या शर्ट ड्रेसमधील फोटो व्हायरल झाले होते. यावेळी तिला ट्रोलचा सामना करावा लागला होता. तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे.

हेही वाचंलत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Bilagi (@adi_bilagi)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news