

ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी यांच्या घटस्फोटाच्या बातमीने काही महिन्यांपूर्वी सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. या संपूर्ण प्रकरणावर आता ईशाने पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केले आहे. पतीपासून वेगळे झाल्यानंतर आपल्या आयुष्यात ‘प्रेम आणि रोमान्स’ची कमालीची कमतरता जाणवत असल्याचे ईशाने एका मुलाखतीत उघडपणे मान्य केले आहे.
एका मुलाखतीदरम्यान, ईशाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि प्रेमाबद्दलच्या तिच्या दृष्टिकोनाबद्दल मनमोकळा संवाद साधला. ती म्हणाली, ‘मला असे वाटते की, प्रेम आणि रोमान्स कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात आणि सध्या मी माझ्या आयुष्यात हीच गोष्ट मिस करत आहे. मला रोमँटिक राहायला खूप आवडते. मी पूर्णपणे ‘रोम-कॉम’ टाईप व्यक्ती आहे. मला प्रेमाची गाणी आणि प्रेमकथा प्रचंड आवडतात.’ पती भरत तख्तानीपासून वेगळे होण्याच्या या कठीण निर्णयामध्ये संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, असेही ईशाने सांगितले.