Disha Patani First look|'शिवम इज बॅक!' १७ वर्षांनंतर इमरान हाश्मी पुन्हा त्याच अंदाजात; 'आवारापन-२'चा दिशाचा 'हा' लूक पाहिलात का?

awarapan-2 -Disha Patani| 'शिवम इज बॅक!' १७ वर्षांनंतर इम्रान हाश्मी पुन्हा त्याच अंदाजात; 'आवारापन-२'मधील दिशा पटानीचा 'हा' लूक पाहिलात का?
Emraan Hashmi-Disha Patani
Disha Patani new look in Emraan Hashmi starrer film instagram
Published on
Updated on
Summary

बॉलिवूडचा 'सीरिअल किसर' आणि अभिनयाचा बादशाह इम्रान हाश्मी आपल्या करिअरमधील सर्वात गाजलेल्या 'आवारापन' चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहे. तब्बल १७ वर्षांनंतर 'शिवम' हे पात्र पुन्हा मोठ्या पडद्यावर अवतरणार असून, यावेळी त्याच्या जोडीला बॉलिवूडची 'नॅशनल क्रश' दिशा पटानी आहे. नुकताच या चित्रपटातील दिशाचा लूक आणि इम्रानसोबतची तिची केमिस्ट्री समोर आली असून, चाहत्यांनी या जोडीला आतापासूनच 'ब्लॉकबस्टर' ठरवलं आहे.

Emraan Hashmi-Disha Patani awarapan-2 look video goes viral on social media

मूळचा 'आवारापन' हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता. सीरियल किसरच्या भूमिकेतल्या इमरानने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच भुरळ घातली होती. त्यातील इम्रान हाश्मीचा शिवम ही व्यक्तीरेखा, प्रेमकथा आणि सुपरहिट संगीत आजही आठवणारे आहे. आता तब्बल १७ वर्षांनंतर, २०२६ मध्ये इम्रान हाश्मी पुन्हा एकदा त्याच 'शिवम'च्या अंदाजात परतत आहे. 'आवारापन २' ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती, मात्र आता दिशा पटानीच्या एन्ट्रीने या चर्चेला अधिक उधाण आले आहे.

इम्रान-दिशाची जोडी आणि व्हायरल लूक

एक्स अकाऊंटवर या चित्रपटाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होतोतय. ज्यामध्ये दिशा ऑल व्हाईट वेस्टर्न ड्रेसमध्ये इमरान हाशमीसोबत शूट करताना दिसतेय. 'आवारापन २' मधील दिशा पटानीचा हा पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या चित्रपटात दिशा एका अत्यंत ग्लॅमरस आणि रहस्याने भरलेल्या भूमिकेत दिसत आहे. विशेषतः इम्रान हाश्मी आणि दिशा पटानी यांच्यातील केमिस्ट्रीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या भागात इम्रानची जोडी श्रिया सरनसोबत गाजली होती, पण आता दिशासोबतचा त्याचा 'इंटेंस' लूक पाहिल्यानंतर दोघांचाही नवा लूक नवी कथा पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

१७ वर्षांची प्रतीक्षा आणि 'शिवम'ची जादू

इम्रान हाश्मीसाठी 'आवारापन' हा चित्रपट त्याच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला होता. या चित्रपटातील 'तोयबा तोयबा' आणि 'तेरा मेरा रिश्ता' सारखी गाणी आजही वाजवली जातात. रिपोर्टनुसार, सिक्वेलमध्ये देखील मूळ चित्रपटाचा आत्मा तसाच ठेवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करत आहेत.

रिलीज डेट का बदलली?

सूत्रांच्या माहितीनुसार, 'आवारापन २' हा चित्रपट आधी ३ एप्रिलला रिलीज होणार होता. पण आता तो स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. मोठ्या सुट्टीचा फायदा घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

(video- Ashish A Pawar x account वरून साभार)

इम्रान-दिशाची केमिस्ट्री

या चित्रपटाची लक्षवेधी बाब म्हणजे इम्रान हाश्मी आणि दिशा पटानी यांची जोडी. नुकतेच या चित्रपटातील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये इम्रानचा 'रफ अँड टफ' लूक आणि दिशाचा कमालीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. या दोघांमधील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री इतकी जबरदस्त दिसत आहे की, सोशल मीडियावर सध्या त्यांच्याच फोटोंची चर्चा रंगली आहे. पहिल्या भागात इम्रानच्या 'शिवम' या पात्राने प्रेक्षकांना वेड लावले होते, आता दिशाच्या येण्याने या प्रेमकथेला एक नवं ट्विस्ट मिळणार आहे, असे म्हणायला हरकत नाही.

'आवारापन २' मध्ये 'तो' प्रसिद्ध गायक गाणार गाणं?

रिपोर्टनुसार, मूळ चित्रपटातील 'तो फिर आओ' आणि 'तेरा मेरा रिश्ता' सारखी अजरामर गाणी गाणारा पाकिस्तानी गायक मुस्तफा जाहिद पुन्हा एकदा 'आवारापन २' मध्ये गाताना दिसणार आहे.

सनी देओलच्या चित्रपटाचे आव्हान

इमरानचा आवारापन २ हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. पण याच दिवशी सनी देओलचा 'लाहोर १९४७' देखील रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे २०२६ च्या स्वातंत्र्य दिनी बॉक्स ऑफिसवर इमरान विरुद्ध सनी देओल आमना सामना पाहायला मिळेल. यामध्ये सनी देओल सोबत प्रीति जिंटा असेल. 'लाहौर १९४७' ची निर्मिती आमिर खान करत आहे. दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचे आहे. अभिनेत्री शबाना आजमी देखील महत्वाच्या भूमिकेत असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news