

युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर फायरिंग करत हल्ला केल्याची घटना समोर आली होती. हरियाणातील गुरुग्राममध्ये एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तींपैकी एकाला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी पहाटे 4 ते 4.30च्या दरम्यान गोळीबार झाला असल्याचे बोलले जात आहे. या घटनेतील आरोपीला चकमकीत पकडले आहे. त्याच्या पायावर गोळी लागली आहे. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. (Latest Entertainment News)
ईशांत गांधी असे पकडल्या गेलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने चकमकीदरम्यान इशांतने पोलिस टीमवर बरेच राऊंड फायर केले त्यानंतर त्याला पकडण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार जेव्हा इशांतला समर्पण करण्यास सांगितले त्यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. घटनास्थळी एक मोटरसायकल, एक पिस्तूल आणि एक रिकामे काडतुस सापडले आहे
17 ऑगस्टला एल्विशच्या घरावर हल्ला झाला होता. हल्ल्यावेळी हल्लेखोरांनी मास्क घातले होते. हल्ल्यावेळी एल्विश घरी नसल्याचे सूत्रांनी सांगितले. एल्विशचे वडील रामअवतार यादव यांनी याबाबत अधिक सांगितले आहे. ‘पहाटे जवळपास साडेपाच वाजता आम्हाला आवाज आला. त्यानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता. त्यात दोन व्यक्ति यात होते कदाचित तिसराही असावा. आम्ही पोलिसांना कळवले. या लोकांनी 15 राऊंडहून अधिक राऊंड फायर केले.
जुगाराला प्रोत्साहन असलेल्या कारणावरून हा हल्ला केल्याचे समोर येत आहे. हल्ल्यानंतर इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेयर केली होती. ज्यात म्हणले होते की 'माझ्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. माझे कुटुंब आणि मी सुरक्षित आहे. तुमच्या काळजीसाठी आभार
हल्ला झाल्यापासून एल्विशच्या घराबाहेर एक प्रकारची शांतता आहे. त्याचे वडील दिल्लीला गेले आहेत. तर आई इतर नातेवाईकांकडे गेली आहे. स्वत: एल्विश मुंबईला असल्याचे समोर आले होते.
एल्विषच्या या घरावरील या हल्ल्याची जबाबदारी भाऊ गॅंगने घेतली असल्याचे समोर आले आहे.