अभिनेत्री रुबिना दिलैक 2023 मध्ये जुळ्या मुलींची आई बनली. यानंतर ती अनेकदा मुलींसोबतचे फोटो व्हीडियो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. पण या दरम्यान एक धक्कादायक अनुभव तिने चाहत्यांशी शेयर केला आहे. एका व्लॉगमध्ये तिने सांगितले की लोक अनेकदा तिच्या दोन्ही मुलींच्या रंगाची तुलना करतात. तिच्या एका मुलीचा रंग गोरा आहे तर तिच्या तुलनेत दुसरी मुलगी थोडी सावळी आहे. याबाबत बोलताना ती म्हणते की, लोक या दोघींची तुलना करतात, जे खूप भयानक आहे. पण मी त्यांना कायमच सांगते की, माझी मुलगी सुंदर आहे. मग ती गोरी असो की सावळी मला फरक पडत नाही. ही तुलना कधी माझ्या घरी आणू नका.’ (Latest Entertainment Update)
रुबिना म्हणाली की तिला अनेकदा रंग उजाळवण्याचे घरगुती सल्लेही लोकांनी दिले. ती म्हणते, नातेवाईक आणि अनेक परिचितांनी रंग गोरा करण्यासाठी बेसन लावण्याचा सल्लाही दिला होता. पण मी त्यांना नकार देते आणि म्हणते माझ्या मुली आहेत तशा सुंदर आहेत.a
रुबिना म्हणते, ती तिच्या मुलींना लहानपणांपासूनच स्वत:च्या रंगाबाबत आत्मविश्वास बाळगायला शिकवला आहे. हे सगळे समजायला त्या अजून लहान आहेत. पण त्यांच्यासमोर मी सतत हळूहळू बोलत असते की 'तू जशी आहेस तशी छान आहेस, तू मजबूत आहेस, तू निडर आहेस.’ आपण सौंदर्याची ठराविक मानके अशीच दूर सारायला हवीत. मला हे समजायला जवळपास 30 वर्षे लागली. मला वाटते की माझ्या मुली आधीपासूनच हे शिकाव्यात.
रुबिना सध्या लाफ्टर शेफ्स 2 मध्ये मित्र राहुल वैद्य याच्यासोबत दिसते आहे. राहुल आणि रुबिना यांचे बॉंडिंग अनेकांना आवडते आहे. या शोमध्ये आता अभिनव शुक्ल देखील या शोमध्ये दिसणार आहे.