Iconic Romantic Song: चालत्या गाडीत सुचली एक ओळ... घाईघाईत लिहिलं गाणं; 32 वर्षांनंतरही 'त्या' गाण्याची जादू कायम

Ek Ladki Ko Dekha Song Story: ‘1942: ए लव्ह स्टोरी’मधील कुमार सानू यांच्या आवाजातील ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ हे गाणं आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
Ek Ladki Ko Dekha Song Story
Ek Ladki Ko Dekha Song StoryPudhari
Published on
Updated on

Ek Ladki Ko Dekha Song Story: बॉलिवूडमधील अनेक गाण्यांच्या निर्मितीमागे रंजक किस्से दडलेले आहेत. असाच एक किस्सा आहे 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1942: ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील गाजलेल्या ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ या गाण्याचा. कुमार सानू यांच्या आवाजातील हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाते.

या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिले होते. विशेष म्हणजे या गाण्याची कल्पना आणि सुरुवातीच्या ओळी जावेद अख्तर यांना एका प्रवासादरम्यान सुचल्या होत्या.

सुरुवातीला गाण्याची जागाच नव्हती

जावेद अख्तर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, चित्रपटाची कथा ऐकताना एका सिनमध्ये गाणं नव्हतं. मात्र जावेद अख्तर यांनी त्या प्रसंगासाठी गाणे असावे, असा आग्रह धरला.

दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी सुरुवातीला त्या ठिकाणी गाण्याची गरज नसल्याचे सांगितले. मात्र एखादे उत्कृष्ट गाणे तयार करून दिल्यास त्याचा विचार करू, असे त्यांनी म्हटले होते. जावेद अख्तर यांनी गाणे लिहून देण्याची जबाबदारी घेतली, पण इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे ते गाणं लिहायचं विसरले.

चार दिवसांनी फोन आला आणि मग धावपळ...

काही दिवसांनंतर आर. डी. बर्मन यांच्या टीमकडून जावेद अख्तर यांना भेटीसाठी फोन आला. गाणे अद्याप तयार नसल्याने त्यांची धावपळ सुरु झाली.

ते भेटीसाठी जात असतानाच त्यांच्या मनात अचानक एक कल्पना आली. प्रवासात असतानाच त्यांना ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा...’ ही ओळ सुचली. मुंबईतील एका सिनेमागृहाजवळून जात असताना ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर त्यांनी गाण्याचा एक अंतरा लिहून आर. डी. बर्मन यांना दिला. गंमतीची गोष्ट म्हणजे, चित्रपटातून आपल्याला काढून टाकले जाऊ नये या भीतीतून आपण हे गाणे घाईत लिहिले, असा किस्साही जावेद अख्तर यांनी सांगितला.

Ek Ladki Ko Dekha Song Story
Ramayana: 'रामायण'चे ४००० कोटींचे बजेट नक्की कशासाठी? यशने सांगितला खरा हिशोब

पंचम दांच्या निधनापूर्वीच गाणे झाले होते फायनल

या गाण्याला महान संगीतकार आर. डी. बर्मन अर्थात पंचम दा यांनी संगीत दिले होते. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

आर. डी. बर्मन यांचे 4 जानेवारी 1994 रोजी निधन झाले, तर अनिल कपूर आणि मनीषा कोईराला यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘1942: ए लव्ह स्टोरी’ हा चित्रपट 15 एप्रिल 1994 रोजी प्रदर्शित झाला. जावेद अख्तर यांच्या आठवणीनुसार, पंचम दांच्या निधनापूर्वीच ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे फायनल करण्यात आले होते.

Ek Ladki Ko Dekha Song Story
Awarapan 2 BO: इमरान हाश्मीच्या ‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 3 दिवसांत किती कोटी कमावले? आकडा वाचून थक्क व्हाल

आज 32 वर्षांनंतरही कुमार सानू यांच्या आवाजातील हे गाणे रसिकांच्या मनात आहे. गाण्याचे सुंदर शब्द, पंचम दांचे संगीत आणि कुमार सानू यांचा आवाज यामुळे ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर रोमँटिक गाण्यांपैकी एक बनलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news