

दुबईस्थित ट्रॅवल इनफ्लूएन्सर आणि फोटोग्राफर अनुनय सूद याचे निधन झाले आहे. अनुनयच्या निधनावेळी त्याचे वय 32 वर्ष होते. त्याच्या कुटुंबाने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत त्याच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे. अनुनयच्या मृत्यूचे कारण अजूनही समोर आलेले नाही. (Latest Entertainment News)
कुटुंबीयांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणले आहे की, अत्यंत दुखी अंतकरणाने आम्हाला प्रिय अनुनयच्या निधनाची बातमी शेयर करावी लागते आहे. या कठीण काळात आम्ही तुमच्याकडून आमच्याप्रती समंजसपणा आणि प्रायव्हसी जपली जाण्याची विनंती करतो आहे. कृपया त्याचे कुटुंब आणि जीवलगांच्या घराच्या आसपास गर्दी करणे टाळा. त्याच्या कुटुंबाला तुमच्या प्रार्थनेत जरूर ठेवा. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. ‘
काय होती अनुनयची शेवटची पोस्ट
एक कार ब्रॅंड इवेंटमधील अनेक फोटो शेयर केले आहेत. लास वेगासमधील फोटो त्याने यावेळी शेयर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, अजूनपण विश्वास होत नाही की मी वीकएंडला दिग्गज आणि ड्रीम मशीनच्यामध्ये घालवतो आहे.’
अनुनय सुद एक ट्रॅवल इनफ्लूएन्सर आणि फोटोग्राफर होता. त्याचे इंस्टाग्रामवर 14 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबवर 3.8 लाख सब्सक्रायबर आहेत. तो त्याच्या ट्रॅवल व्लॉग, रील्स आणि व्हीडियोजसाठी प्रसिद्ध होता. अनुनय सुद लागोपाठ तीन वर्षं फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 डिजिटल स्टार्सच्या यादीत होता. तसेच मृत्यूपूर्वी त्याने जवळपास 30हून अधिक देश पालथे घातले होते. ज्यामध्ये फ्रांस, इटली, ग्रीस आणि जपान सारखे देश आहेत.