

कलाकारांना ट्रोलिंग नवीन नाही. अनेकदा त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबाबत अनेक लहान सहान गोष्टींबाबतही ट्रोल केले जाते. अभिनेता कपिल होनरावला मात्र एका विचित्र ट्रोलचा सामना करावा लागला. कपिलने काही महिन्यापूर्वीच नवीन घर खरेदी केले आहे. आता या नवीन घरात कपिलने पत्नीसह पूजा करून गृहप्रवेश केला आहे. कपिलने नव्या घराचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले होते.
या फोटो आणि व्हीडियोवर अभिनंदन करणाऱ्या कमेंटचा पाऊस पडला आहे. पण काहीनी या पोस्टवर निगेटिव्ह कमेंटही केली आहे. कपिलने या कमेंटचा स्क्रीन शॉट सोशल मिडियावर शेयर केला आहे. कपिलची पत्नी मराठी नाही तर ती हिन्दी भाषिक आहे. यावर त्या ट्रोलर कमेंट केली. तो आपल्या कमेंटमध्ये म्हणतो, होनराव म्हणजे तू मराठी ना? बायको XXX आहे काय? ए अरे महाराष्ट्र आपला आहे. आपल्या महाराष्ट्रात या लोकांनी आधीच गर्दी केलीये. पूजा तरी आपल्या पंडितला घेऊन करायची. काय अभिमान आहे की नाही महाराष्ट्राचा…”
ही कमेंट आपल्या स्टोरीमध्ये रिपोस्ट करत कपिलने या ट्रोलरला चांगलेच खडसावले आहे. कपिल आपल्या कमेंटमध्ये म्हणतो, “काय करायचं या लोकांचं…यांना महाराष्ट्र नीट लिहिता येत नाही. लवकर बरा हो XXXX… कलाकारांना सतत ट्रोल केलं जात आहे. या ट्रोलिंगने अतिशय वाईट पातळी गाठली आहे.’
कपिल यापूर्वी सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत त्याने मल्हार ही व्यक्तिरेखा साकारली होती.