Ajay Devgan याच्या ‘दृश्यम २’ च्या शुटींगला सुरुवात

Ajay Devgan याच्या ‘दृश्यम २’ च्या शुटींगला सुरुवात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय चित्रपटांतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांची यादी काढली तर त्यात 'दृश्यम' सिनेमा नक्कीच टॉपटेनमध्ये घ्यावा लागेल. आता त्याच चित्रपटाचा सीक्वेलदेखील हिंदीत येत आहे. बालिवूडचा सिंघम अजय देवगन ( Ajay Devgan ) याने त्याचा आगामी चित्रपट 'दृश्यम २' च्या शुटींगला सुरुवात केली आहे. शुटींगच्या दरम्यानचा सेटवरील फोटो त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरुन शेअर करत आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. तसेच त्याने या पोस्ट सह कॅप्शन मध्ये लिहले आहे की, "काय विजय पुन्हा आपल्या कुटुंबाची रक्षा करु शकेल?"

अजय देवगन ( Ajay Devgan ) याने शेअर केलेल्या फोटो मध्ये अजय देवगन याच्या सोबत अभिनेत्री श्रेया सरन सुद्धा दिसत आहे. 'दृश्यम' चित्रपटाने १०० कोटीहून अधिकचा गल्ला जमवला होता. आता या चित्रपटाचा सिक्वल बनविण्याची तयारी सुरु झाली आहे. या चित्रपटात पहिल्या चित्रपटातील सर्व कलाकारांना पाहता येणार आहे. त्यामुळे अजय देवगनसह तब्बू, श्रेया सरन, इशिता दत्ता, रजत कपूर यांना देखिल पुन्हा आपल्याला सिक्वेलमध्ये पहायला मिळणार आहे. सध्या चित्रपटाचे शुटींग मुंबईमध्ये सुरु झाले आहे. तसेच गोव्यात चित्रपटाचे बरेचसे शुटिंग केले जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

दृश्यम या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामत याने केले होते. पण, त्याच्या निधनामुळे आता ही जबाबदारी अभिषेक पाठक यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आता ही कामगिरी पाठक कसे बजावतात याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. पहिल्या चित्रपट जिथे संपतो त्यानंतर ७ वर्षांनी 'दृश्यम 2' ची गोष्ट सुरू होते. यावेळी विजय सालगावकर त्याच्या कुटुंबाला वाचविण्यासाठी काय करतो, ते या क्राईम-थ्रिलर चित्रपटातून पाहायला मिळेल. ( Ajay Devgan )

अर्थात ज्यांनी अ‍ॅमेझॉन प्राईमवर अभिनेता मोहनलालचा 'दृश्यम 2' पाहिला आहे, त्यांच्यासाठी यात काही नवीन नसेल. कारण याच चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. अजयचा 'दृश्यम' देखील मोहनलाल यांच्या मूळ मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news