kapil sharma : कपिल शर्मा दिसणार नंदिता दास यांच्या चित्रपटात

kapil sharma : कपिल शर्मा दिसणार नंदिता दास यांच्या चित्रपटात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमध्ये 'न भूतो, न भविष्यति' अशी एक गोष्ट घडत आहे. कारण कोणाच्या ही ध्यानी मनी नसेल अशी एक भिन्न स्वभावाची म्हणा किंवा भिन्न अदाकारी साकरणारी एक कलाकारांची जोडी एकत्र काम करत आहेत. ती जोडी म्हणजे कॉमेडियन कलाकार कपिल शर्मा ( kapil sharma ) आणि अभिनेत्री, दिग्दर्शक असणारी नंदिता दास (nandita das). ही नावे पाहून तुम्हाला ही आश्चर्ययाचा धक्का बसला आहे. पण, हे खरं आहे की नंदिता दास आणि कपिल शर्मा एकत्र काम करत आहे. नंदिता दास या त्यांचा नवा चित्रपट घेऊन येत आहेत आणि या चित्रपटात कपिल शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नंदिता दास स्वत: हा चित्रपट दिग्दर्शित करत असून यामध्ये कपिलचा एक नवा अंदाज पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

कॉमेडी किंग कपिल शर्मा ( kapil sharma ) आणि नंदिता दास यांनी एकत्रित काम करण्याचे ठरवलं आणि यांच्या चित्रपटाचे शुटींग आता पुढील महिन्यात भूवनेश्वर आणि ओडिसामध्ये सुरु होत आहे. हा चित्रपट फूड डिलिव्हरी बॉय वर आधारीत आहे. या फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका कपिल शर्मा साकारणार आहे. तर अभिनेत्री शाहना गोस्वामी ( shahana goswami ) ही कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत असेल. अप्लॉज एंटरटेंमेंट आणि नंदिता दास इनिशेटिव्ह द्वारे हा चित्रपट बनवला जात आहे.

यावेळी नंदिता दास म्हणाल्या, सामान्य लोकांच्या नजरेत आणि मनात जे असतं तेच आम्ही या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न करत आहोत पण, यासाठी जबरदस्त कलाकार आणि टीम एकत्र आले आहेत. एके दिवशी कपिल शर्मा ( kapil sharma ) अचानक माझ्या स्क्रीनच्या समोर आला. मी त्याचा शो पाहिला नाही. पण, मला हे माहिती आहे की तो सामान्य व्यक्तीचे प्रतिनिधित्व करु शकेल. तसेच या चित्रपटाद्वारे तो स्वत:सह इतरांना देखिल आश्चर्यचकीत करेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

अप्लॉय एंटरटेंमेंटचे सीईओ समीर नायर म्हणाले, या चित्रपटात अत्यंत सामान्य व्यक्तींच्या जीवनाला दाखवण्यात आले आहे. तसेच हे सामान्य लोक वास्तवात खऱ्या अर्थाने देशाची अर्थव्यवस्था कशा प्रकारे चालवतात हे देखिल या चित्रपटात आपण पाहू शकता. या प्रोजेक्ट बाबत बोलताना कपिल शर्मा ( kapil sharma ) म्हणाला, मी या चित्रपटाबाबत खूप उत्साही आहे. मी नंदिता दास यांचा अभिनय आणि दिग्दर्शन दोन्ही पाहिलं आहे. त्यांच्याकडे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन आहे.

आता पर्यंत कपिल शर्मा हा प्रेक्षकांना त्याच्या शो व चित्रपटातून हसवत आला आहे. एक कॉमेडियन म्हणून त्याला खूपच मोठी लोकप्रियता मिळाली आहे. पण, नंदिता दास यांच्या चित्रपटातून तो वेगळ्याच भूमिकेत आणि अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचे हे वेगळे पण, नक्कीच रसिकांना सुखावून टाकेल. तसेच आजपर्यंत अत्यंत संवेदनशील, गांभीर्यपूर्ण अभिनय करताना व विषय हाताळताना आपण पाहिले आहे. आता हे भिन्न स्वभावी कलाकार एकत्र येत नेमके प्रेक्षकांचे कसे मनोरंजन अथवा प्रबोधन करतात हे पाहणे रंजक ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news