पुढारी ऑनलाईन डेस्क - जस्टिस हेमा कमिटीच्या रिपोर्टनंतर मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीत मोठा गोंधळ उडाला आहे. एकानंतर एक घटना समोर येत आहेत. चित्रपट इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेक महिलांनी काही निर्माते आणि दिग्दर्शकांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता एका महिला रायटरने दिग्दर्शक व्ही के प्रकाशवर आरोप केला आहे की, व्ही के प्रकाशने तिला आपल्या हॉटेलच्या रुमवर बोलावून गैरवर्तणूक केली होती.
खरंतर, लेखिकेला स्टोरीवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. पण तिथे तिच्याशी गैरवर्तन झाल्याचे तिने सांगितले.
एका न्यूजशी बोलताना लेखिकेने ४ एप्रिल, २०२२ च्या घटनेबद्दल सांगितले. ती म्हणाली की, एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं, जिथे एक रुम रिझर्व्ह केली होती. तो त्याच हॉटेलमध्ये थांबला होता. तिने सांगितले की, व्ही के प्रकाश तिची स्टोरी ऐकण्यास तयार झाला. तिने अनेकदा सांगितले की, ती स्टोरी पाठवून देईल. जेव्हा स्टोरी आवडेल तेव्हा पुढे चर्चा करू. पण प्रकाशने सकारात्मक प्रतिक्रिया देत स्क्रिप्टच्या डिटेलिंगसाठी बोलावलं. तिला कोच्ची ते कोलम प्रवास करण्यासाठी करणयासाठी अडचणी होत्या. तर त्याने लवकरात लवकर भेटण्यासाठी बोलावले. कारण त्याला पुढे दुसऱ्या कामासाठी बाहेर जायचं होतं.
कोलममध्ये हॉटेलमध्ये एक रूम बुक केलं होतं. जेव्हा प्रकाश सायंकाळी रुममध्ये आला तेव्हा स्टोरी ऐकताना त्याने तिला मध्येच थांबवलं आणि ड्रिंक ऑफर केली. त्याने तिला विचारलं की, तुला अभिनय आवडतो का. तेव्हा तिने नकार दिलाय तरीही त्याने एका सीनवर तिला अभिनय करण्यास सांगितले.
लेखिका म्हणाली, जेव्हा तिने नकार दिला तेव्हा व्ही के प्रकाशने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला आणि बिचान्यावर ढकलंल...पण तिने नकार दिला आणि तिथून बाहेर जाण्यासाठी सांगितले. तिने सांगितले की, ती तिथे स्टोरी चर्चा करण्यासाठी आली होती. यावर प्रकाशने विचारले की, ती तिच्या या निर्णयावर ठाम आहे? तर तिने हो सांगितले. तिने पुढे सांगितले की, या प्रसंगानंतर प्रकाश तेथून निघून गेला. १५ मिनिटांनंतर ती तेथून कोच्चीसाठी निघून गेली होती.
लेखिकेने पुढे सांगितले की, पुढील दिवशी सकाळी प्रकाशचे खूप मिस्ड कॉल आले होते. जेव्हा तिने त्याला कॉल केला तेव्हा तो म्हणाला की, माझी प्रतिमा खराब करू नकोस आणि प्रवासासाठी १० हजार रुपये पाठवले. ती म्हणाली की, जेदेखील आहे ते सत्य आहे आणि ती यावर ठाम आहे. तिने स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमकडे याबद्दल तक्रार देखील दाखल केली होती.