कंगना यांना धमकी! 'Emergency रिलीज केल्यास तुमचा शिरच्छेद करु'

कंगना यांचा शिरच्छेद करु, धमकीने खळबळ
Emergency, BJP MP Kangana Ranaut
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांची प्रमुख भूमिका असलेला 'इमर्जन्सी' ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.(Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत (BJP MP Kangana Ranaut) यांची प्रमुख भूमिका असलेला 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपट पुढील महिन्यात ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कंगना यांना शीख उग्रवादी गटांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाल्यानंतर कंगना यांना धमक्या आल्या आहेत. कंगना ह्या हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील भाजपच्या खासदार आहे.

दरम्यान, कंगना यांनी या प्रकरणी पोलिसांची मदत मागितली आहे. सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये, विकी थॉमस सिंग हा एक ख्रिश्चन बनलेला निहंग शीख आहे; ज्याने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा एक गूढ उल्लेख केला आहे.

'इंदिरा गांधी यांचे काय झाले होते?'

"जर चित्रपटात त्याला (मारला गेलेला खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले) दहशतवादी म्हणून दाखवला असेल, तर तुम्ही ज्या व्यक्तीचा चित्रपट करत आहात; त्या व्यक्तीचे (इंदिरा गांधी) काय झाले होते? सतवंत सिंग आणि बेअंत सिंग कोण होते? आम्ही आमचे मस्तक संतजींना अर्पण करू, आणि जे डोके देऊ शकतात ते शिरच्छेदही करु शकतात," असे त्या व्यक्तीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. सतवंत सिंग आणि बेअंत सिंग हे इंदिरा गांधींचे दोन अंगरक्षक होते. ज्यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची हत्या केली होती.

कंगना यांनी मागितली पोलिसांची मदत

मायक्रो-ब्लॉगिंग साइट X वर हा व्हिडिओ शेअर करत कंगना रणौत यांनी पोलिसांची मदत मागितली आहे. "कृपया याकडे लक्ष द्यावे," असे त्यांनी पुढे पोस्टमध्ये लिहिले आहे. हे ट्विट त्यांनी महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि पंजाब पोलिसांना टॅग केले आहे.

Emergency चित्रपटावर बंदीची मागणी

अनेक शीख संघटनांनी ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या Emergency चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटात शीख समुदायाला चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आले असल्याचा त्यांचा दावा आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने म्हटले आहे की, भिंद्रनवाले याला समुदायाचा शहीद म्हणून घोषित केले असून संपूर्ण शीख समुदायाची फुटीरतावादी म्हणून प्रतिमा निर्माण करणे चुकीचे आहे.

Emergency, BJP MP Kangana Ranaut
मल्याळम इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाच्या आरोपावर Prithviraj Sukumaran म्हणाला..

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news