

Diljit Dosanjh Royal entry at Mat Gala 2025
न्यू-यॉर्क : मेट गाला २०२५ ची थीम सुपरफाईन टेलरिंग ब्लॅक स्टाईल अशी होती. यावेळी हॉलिवूड, बॉलिवूड दिवा रेड कार्पेटवर उतरल्या. तर बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, कियारा आडवाणी, नताशा पूनावाला, दिलजीत दोसांझ, प्रियांका चोप्रा हे स्टार्स मेट गालाच्या रेड कार्पेटवर चमकले. खास म्हणजे, गायक, अभिनेता दिलजीत दोसांझचा लूक लक्षवेधी ठरला.
मेट गाला २०२५ मध्ये पंजाबी सुपरस्टार, गायक दिलजीत दोसांझने पंजाबी ट्रॅडिशनल आऊटफिटमध्ये डेब्यू केलं आहे. त्याने नेपाळी-अमेरिकन डिझायनर प्रबल गुरुंग याने डिझाईन केलेला आऊटफिट परिधान केला होता. रॉयल लूक पाहून असं वाटत होतं की, त्याने पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंहला ट्रिब्यूट दिलं आहे.
दिलजीत दोसांझने मेट गालासाठी आयवरी शेरवानी सूट परिधान केला होता. त्यामागे एक केप देखील होतं. त्या केप मध्ये पंजाबचा नकाशा आणि काही पंजाबी अक्षरांनी सजवलेली गोल्डन एम्ब्रॉयडरी होती. वरून सुंदर पगडीने दिलजीतचा लूक अगदी खास बनवला.
दिलजीतने घातलेली ज्वेलरी पाहता मोती आणि पन्ना मल्टीलेयर नेकलेस परिधान केला होता. वरून एक ग्रीन कलरचा चोकर घातला होता. सर्वांची नजर फक्त दिलजीतच्या नेकलेसवरच होती. मुळात हा नेकलेस १९२८ मध्ये कार्टियरने पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंहसाठी तयार केला होता. महाराजासाठी तयार करण्यात आलेली ही सर्वात महाग ज्वेलरी पैकी एक आहे.
मेट गाला २०२५ मधील फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दिलजीतचा डेब्यू इतका लक्षवेधी ठरेल, असा अंदाजही लावला नव्हता. एकाने म्हटलंय-ट्रॅडिशनल लूकमध्ये ‘पंजाबची शान’. आणखी एकाने म्हटलंय - ‘पंजाबी आ गए ओये’. तर काहींनी त्याला ट्रोल देखील केले आहे. ‘ये मेट गाला आहे की लग्नाची वरात’, अशी एकाने टीका केलीय.